Lokmat Sakhi >Beauty > थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये ? ही पहा योग्य पद्धत...

थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये ? ही पहा योग्य पद्धत...

Aloe Vera for your skin during winters : How to use aloe Vera gel on skin during winters : थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये असा प्रश्न पडतो, मग बघा नेमकं काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 18:05 IST2024-12-16T18:04:39+5:302024-12-16T18:05:10+5:30

Aloe Vera for your skin during winters : How to use aloe Vera gel on skin during winters : थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये असा प्रश्न पडतो, मग बघा नेमकं काय करायचं?

Aloe Vera for your skin during winters How to use aloe Vera gel on skin during winters | थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये ? ही पहा योग्य पद्धत...

थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये ? ही पहा योग्य पद्धत...

केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी एलोवेरा जेल फार मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्वचेच्या आणि केसांच्या अनेक लहान मोठ्या समस्या दूर करण्यासाठी एलोवेरा जेल (Aloe Vera for your skin during winters) अतिशय फायदेशीर ठरते. हिवाळ्यात आपल्याला त्वचेची अधिक जास्त काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्याने शक्यतो आपल्या सगळ्यांचीच त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडल्याने त्वचेच्या अनेक समस्या सतावतात. अशावेळी आपण त्वचेसाठी नैसर्गिक उपाय म्हणून एलोवेरा जेलचा वापर करतो(How to use aloe Vera gel on skin during winters).

थंडीच्या दिवसांत त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी एलोवेरा जेल त्वचेवर चोपडून लावले जाते, परंतु थंडीच्या दिवसांत त्वचेवर एलोवेरा जेल लावणे योग्य आहे की अयोग्य ? काहीवेळा आपण त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी अनेक नैसर्गिक पदार्थांचा उपयोग करतो. परंतु  हे नैसर्गिक पदार्थ देखील त्वचेचा कोरडेपणा कमी करण्याऐवजी वाढवतात. आपण अनेकदा पाहिले असेल की, त्वचेवर एलोवेरा जेल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होण्याऐवजी वाढतोच. यासाठी थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये असा प्रश्न पडतो. यासाठी थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये ते पाहूयात.

हिवाळ्यात त्वचेला एलोवेरा जेल लावणे योग्य की अयोग्य ?

थंडीच्या काळात आपल्या त्वचेत अनेक बदल होतात. थंडीमध्ये त्वचेचा कोरडेपणा वाढतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्वचेला मॉइश्चराइज करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. चमकदार त्वचा ठेवण्यासाठी आपण योग्य त्वचेची काळजी घेण्यासोबत आहाराची देखील काळजी घेतली पाहिजे. थंड हवामानात त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी एलोवेराजेल लावता येते. 

भुवया - पापण्यांचे केस विरळ दिसतात? वापरा जादूई होममेड सीरम, महिन्याभरात दिसेल फरक...

एलोवेराजेलमध्ये अँटीऑक्सिडंट सोबतच यात अँटीइम्प्लिमेंटरी आणि एंटी फंगल गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे याच्या वापरामुळे त्वचेशी संबंधित इतर समस्यांचा धोकाही कमी होतो. थंडीच्या दिवसांत एलोवेरा जेल गरजेनुसारच त्वचेला लावावे. जास्तीचे एलोवेरा जेल त्वचेवर चोपडून ठेवू नये. हिवाळ्यात जर तुमच्या त्वचेला एलोवेरा जेल लावणे सूट होत असेल तरच लावावे. याउलट जर त्वचेवर पुरळ किंवा त्वचा लाल होणे यांसारखे अनेक स्किन प्रॉब्लेम्स होत असतील तर एलोवेरा जेल लावणे टाळावे.   

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडून खाज येते? करुन पहा ५ उपाय, खाज होईल कमी- त्वचा दिसेल मऊमुलायम...

जर तुम्ही केमिकल्सयुक्त एलोवेरा जेल वापरत असाल तर त्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात फक्त नैसर्गिक किंवा सेंद्रिय एलोवेरा जेलचा वापर करावा, जे त्वचेच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे.  जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर जास्त जेल लावू नका. थंडीच्या दिवसांत त्वचेवर एलोवेरा जेल लावताना ते गरजेपेक्षा जास्त लावू नये. एलोवेरा जेल त्वचेवर योग्य आणि समान पद्धतीने पसरले जाईल याची खात्री करा. यासोबतच, आपल्याला एलोवेरा जेलची ॲलर्जी नाही याची खात्री करण्यासाठी एलोवेरा जेल त्वचेवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

हिवाळ्यात कोरड्या ओठांवर लिपस्टिकचे तडे दिसतात? ४ टिप्स, लिपस्टिक टिकेलही-दिसेलही छान...

हिवाळ्यात त्वचेला एलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत... 

एलोवेरा जेलमध्ये त्वचेच्या संरक्षणासाठी अँटीऑक्सिडंट आणि इतर महत्वाची जीवनसत्वे फार मुबलक प्रमाणांत असतात. जे हिवाळ्यात आपल्या त्वचेला खोलवर पोषण देतात आणि थंडीपासून बचाव करत त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. थंडीच्या दिवसांत जर तुम्हांला एलोवेरा जेल वापरायचे असेल तर, थंडीत त्वचेचे योग्य पद्धतीने पोषण होण्यासाठी आंघोळीनंतर त्वचा हलकेच पुसून घ्यावी. त्यानंतर, ताजे एलोवेरा जेल त्वचेला लावून हलक्या हातांनी मसाज करून घ्यावा. यामुळे हे एलोवेरा जेल त्वचेत चांगल्या पद्धतीने खोलवर शोषले जाते. एलोवेरा जेल त्वचेतील आर्द्रता लॉक करते आणि हिवाळ्यात त्वचेला तडे जाण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे चेहऱ्याची चमक कमी होत नाही.   

Web Title: Aloe Vera for your skin during winters How to use aloe Vera gel on skin during winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.