Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > चारोळी खा आणि 'या' पद्धतीने चेहऱ्याला लावा- तुमचं खुललेलं रूप पाहून सगळेच करतील कौतूक 

चारोळी खा आणि 'या' पद्धतीने चेहऱ्याला लावा- तुमचं खुललेलं रूप पाहून सगळेच करतील कौतूक 

Almond Powder Face Pack For Dull and Dry Skin: त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी चारोळी अतिशय उपयुक्त ठरते. बघा तिचा वापर कसा करायचा...(how to get rid of dry skin?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2025 16:26 IST2025-10-18T16:25:50+5:302025-10-18T16:26:46+5:30

Almond Powder Face Pack For Dull and Dry Skin: त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी चारोळी अतिशय उपयुक्त ठरते. बघा तिचा वापर कसा करायचा...(how to get rid of dry skin?)

almond powder face pack for dull and dry skin, best face pack for reducing dryness of skin, how to get rid of dry skin  | चारोळी खा आणि 'या' पद्धतीने चेहऱ्याला लावा- तुमचं खुललेलं रूप पाहून सगळेच करतील कौतूक 

चारोळी खा आणि 'या' पद्धतीने चेहऱ्याला लावा- तुमचं खुललेलं रूप पाहून सगळेच करतील कौतूक 

Highlightsहा फेसपॅक कसा तयार करायचा आणि त्याचा आपल्या त्वचेवर कसा परिणाम होतो ते पाहूया..

चारोळी हा पदार्थ आपण बासुंदी, खीर अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हमखास घालतो. कित्येक मिठाई आणि लाडू प्रकारांमध्येही चारोळी घातली जाते. चारोळी ही अतिशय आरोग्यदायी असते. तिच्यामध्ये भरपूर स्निग्धता असल्याने शरीरासाठी ती पोषक आहे. आता त्याचा चारोळीचा वापर करून एक मस्त फेसपॅक तयार करा आणि दिवाळीच्या निमित्ताने तो लावून पाहा (Almond Powder Face Pack For Dull and Dry Skin). हा फेसपॅक कसा तयार करायचा आणि त्याचा आपल्या त्वचेवर कसा परिणाम होतो ते पाहूया..(how to get rid of dry skin?)

 

चारोळीचा फेसपॅक कसा तयार करायचा?

चारोळी वापरून घरच्याघरी अतिशय उत्तम दर्जाचा फेसपॅक कसा तयार करायचा याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ suparnatrikha या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये चारोळीची पावडर घ्या. त्यामध्ये थोडी बदामाची पावडर घाला.

गुडघे, टाचा खूप दुखतात? 'या' पद्धतीने तिळाचं तेल लावा, काही दिवसांतच दुखणं थांबेल

बदाम आणि चारोळी या दोन्ही पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेला छान पोषण देण्यासाठी हे दोन्ही पदार्थ अतिशय उत्तम आहेत.

आता यामध्ये कच्चं दूध, मध आणि जवसाचं जेल घाला. जवसाचं जेल घरी तयार करण्यासाठी जवस थोडे मिक्सरला फिरवून जाडेभरडे बारीक करून घ्या.

 

आता जवसाचं हे मिश्रण आणि पाणी पातेल्यामध्ये एकत्र करून गॅसवर गरम करायला ठेवा. जेव्हा पाणी आटून जेलीसारखा पदार्थ तयार होईल तेव्हा ते पाणी गाळून घ्या. हे जवसाचं जेल फेसपॅकमध्ये घाला. 

Diwali Celebration: लक्ष्मीपुजनाची तयारी कशी करावी? सोप्या ५ टिप्स, वेळेवर धावपळ होणार नाही

सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. त्यानंतर हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला लावा. साधारण १० मिनिटांनी कच्चं दूध चेहऱ्यावर चोळून फेसपॅक काढून घ्या. पाण्याने चेहरा धुवून घ्या आणि त्यानंतर मॉईश्चराईज करा. त्वचेमध्ये खूप छान बदल झालेला दिसून येईल. 


 

Web Title : ग्लोइंग त्वचा के लिए चारोली फेस पैक: दिवाली सौंदर्य रहस्य।

Web Summary : चारोली फेस पैक बादाम पाउडर, अलसी जेल, दूध और शहद का उपयोग करके त्वचा को बढ़ाता है। नियमित उपयोग से चमक आती है। सर्वोत्तम परिणामों के लिए सरल चरणों का पालन करें।

Web Title : Use Charoli face pack for glowing skin: A Diwali beauty secret.

Web Summary : Charoli face pack enhances skin using almond powder, flaxseed gel, milk, and honey. Regular use gives a radiant glow. Follow the simple steps for best results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.