हिवाळा ऋतू सुरू झाला की आपल्या त्वचेच्या तक्रारी अचानकपणे प्रचंड वाढू लागतात. थंडीचे दिवस सुरु झाले की, वातावरणातील थंड हवा आणि कोरडेपणामुळे त्वचेवर त्याचे वेगवेगळया प्रकारचे परिणाम दिसू लागतात. चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कमी होणे, ओठ फुटणे, त्वचा कोरडी व काळवंडलेली दिसणे अशा समस्या अनेकींना सतावतात(almond oil in belly button for glowing skin & dry lips).
आयुर्वेदानुसार, नाभी हा आपल्या शरीराचा केंद्रबिंदू असून ती अनेक नसांशी एकत्रितपणे जोडलेली असते. हिवाळ्यात त्वचा काळवंडू नये आणि ओठ मऊ राहावेत यासाठी नाभीत बदामाचे तेल घालणे हा एक अत्यंत पारंपरिक आणि फायदेशीर उपाय आहे. योग्य पद्धतीने नाभीत बदामाचे तेल घातल्यास त्वचेतील कोरडेपणा कमी होतो, नैसर्गिक ग्लो वाढतो आणि हिवाळ्यात त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घातल्याने त्वचेवर कोणते (almond oil in navel for cracked lips and dry skin) आश्चर्यकारक बदल होतात, ते पाहूयात...
त्वचेसाठी बदामाचे तेलच का ?
बदामाचे तेल व्हिटॅमिन-'ई', अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडयुक्त असते. नाभी हा आपल्या शरीराचा केंद्रबिंदू असून ती शरीरातील अनेक नसांशी जोडलेली असते. जेव्हा आपण नाभीत तेल घालतो, तेव्हा त्यातील पोषण थेट आपल्या चेहऱ्यापर्यंत आणि संपूर्ण त्वचेपर्यंत पोहोचते.
नातीचेच काय आजीचेही केस दिसतील काळेभोर-चमकदार- ताज्या रसरशीत आवळ्याचं तेल ‘असं’ करा...
नाभीत बदामाचे तेल घालण्याचे जबरदस्त फायदे :-
१. नॅचरल ग्लो :- बदामाचे तेल त्वचेचा नैसर्गिक रंग सुधारण्यास मदत करते आणि चेहऱ्यावर एक निरोगी, नैसर्गिक ग्लो आणते.
२. खोलवर ओलावा :- हे तेल कोरड्या त्वचेची समस्या मुळापासून संपवते आणि त्वचेला आतून हायड्रेट ठेवते.
३. सुरकुत्यांपासून बचाव :- बदाम तेलात असलेले व्हिटॅमिन- 'ई' हे 'अँटी-एजिंग'चे काम करते. यामुळे चेहऱ्यावरच्या बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.
४. डाग कमी होतात :- याच्या नियमित वापरामुळे चेहऱ्यावरील काळे आणि जुने डाग हळूहळू फिकट होऊ लागतात.
५. फुटलेले ओठ होतात मऊमुलायम :- जर हिवाळ्यात तुमचे ओठ वारंवार फुटत असतील, तर नाभीत बदामाचे तेल लावणे एखाद्या चमत्कारासारखे काम करते. यामुळे ओठ नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी होतात.
नाभीत बदामाचे तेल लावण्याची योग्य पद्धत...
या घरगुती उपायाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी बदामाचे तेल योग्य पद्धतीने लावणे अत्यंत आवश्यक आहे.
१. नाभी स्वच्छ करा :- रात्री झोपण्यापूर्वी कापूस किंवा स्वच्छ मऊ कापडाने सर्वातआधी नाभी हलकीशी स्वच्छ करून घ्या. यामुळे तेलाचे शोषण नीट होते.
२. तेलाचे थेंब :- शुद्ध बदामाच्या तेलाचे २ ते ३ थेंब थेट नाभीत घाला.
३. हलका मसाज :- हे तेल नाभीत टाका आणि बोटाच्या साहाय्याने नाभीच्या आजूबाजूला १ ते २ मिनिटे हलक्या हाताने गोलाकार मसाज करा.
४. रात्रभर राहू द्या :- मसाज केल्यानंतर तेल पुसू नका ते तसेच राहू द्या आणि झोपा. रात्रभरात आपले शरीर हे तेल पूर्णपणे शोषून घेते, ज्यामुळे त्याचे खोलवर फायदे मिळतात.
हिवाळ्यात निस्तेज आणि कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी हा सर्वात स्वस्त, सोपा आणि असरदार उपाय आहे. दररोज रात्री फक्त १ मिनिटाचा हा छोटासा उपाय तुम्हाला ऐन हिवाळ्यात मऊ, नितळ आणि तजेलदार त्वचा मिळवून देईल. हा उपाय नियमितपणे किमान १५ दिवस केल्यास तुम्हाला चेहऱ्यावर स्पष्ट फरक जाणवेल.
