Lokmat Sakhi >Beauty > संक्रांतीसाठी चेहऱ्याला लावा बदाम- केशर फेसपॅक! चेहऱ्यावर येईल सोन्यासारखा तेजस्वी ग्लो..

संक्रांतीसाठी चेहऱ्याला लावा बदाम- केशर फेसपॅक! चेहऱ्यावर येईल सोन्यासारखा तेजस्वी ग्लो..

Skin Care Tips Using Almond Kesar Face Mask: मकर संक्रांतीसाठी (Makar Sankranti 2025) जर फेशियल, क्लिनअप करायला वेळ मिळाला नसेल तर हा सोपा घरगुती उपाय करून पाहा..(how to make badam kesar face pack for radiant glowing skin?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 16:07 IST2025-01-13T16:06:49+5:302025-01-13T16:07:26+5:30

Skin Care Tips Using Almond Kesar Face Mask: मकर संक्रांतीसाठी (Makar Sankranti 2025) जर फेशियल, क्लिनअप करायला वेळ मिळाला नसेल तर हा सोपा घरगुती उपाय करून पाहा..(how to make badam kesar face pack for radiant glowing skin?)

almond kesar face mask at home, how to make badam kesar face pack for radiant glowing skin | संक्रांतीसाठी चेहऱ्याला लावा बदाम- केशर फेसपॅक! चेहऱ्यावर येईल सोन्यासारखा तेजस्वी ग्लो..

संक्रांतीसाठी चेहऱ्याला लावा बदाम- केशर फेसपॅक! चेहऱ्यावर येईल सोन्यासारखा तेजस्वी ग्लो..

Highlightsतुम्ही जेव्हा हा लेप काढाल तेव्हा त्यासोबत टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा छान मुलायम, स्वच्छ होईल.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी- कुंकू कार्यक्रम, तिळगुळ देण्याघेण्याच्या निमित्ताने नातलग, मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम होतच असतात. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने आपण कसं अगदी तयार असणं गरजेचं आहे. पण त्यासाठी पार्लरमध्ये जायला वेळ मिळाला नाही तर अगदी घरच्याघरी घरातलेच साहित्य वापरून चेहऱ्यावर थोडे घरगुती उपाय केले तरी चालतात. असाच एक छानसा उपाय आपण पाहणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातलेच पदार्थ लागणार आहेत (almond kesar face mask at home). हे पदार्थ फेसपॅकच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा चेहऱ्याला लावाल तेव्हा अवघ्या काही मिनिटांतच चेहऱ्यावर छान ग्लो येईल. त्यासाठी बदाम- केशर फेसपॅक कसा करायचा ते पाहूया..(how to make badam kesar face pack for radiant glowing skin?)

 

बदाम- केशर फेसपॅक कसा करावा?

हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपण बदाम वापरणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की बदाममध्ये व्हिटॅमिन ई आणि त्वचेसाठी अतिशय पोषक असणारे नॅचरल तेल असते. हिवाळ्यात कोरड्या पडलेल्या त्वचेसाठी हे दोन्ही पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात. 

संक्रांतीच्या हळदी- कुंकूसाठी काय मेन्यू करावा? बघा झटपट होणारे, करायला सोपे ५ पदार्थ

सगळ्यात आधी २ ते ३ बदाम घ्या आणि ते खलबत्त्यात कुटून त्याची बारीक पावडर तयार करून घ्या.

ही पावडर आता एका भांड्यात काढा. त्यामध्ये १ चमचा बेसन पीठ, चिमूटभर हळद घाला.

केशराच्या ७ ते ८ काड्या एका कागदात गुंडाळा आणि त्या तव्यावर अर्धा मिनिट गरम करून घ्या. त्यानंतर हातानेच चुरून केशराची पावडर तयार करा. ही केशराची पावडर बदाम आणि बेसन पीठात घाला. 

 

गरजेनुसार कच्चं दूध घालून सगळं मिश्रण कालवून घ्या. हा लेप आता तुमच्या चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांसाठी राहू द्या.

रात्रीचे जेवण झाल्यानंतर 'हे' काम नक्की करा! वजन मुळीच वाढणार नाही- अन्न व्यवस्थित पचेल

त्यानंतर हळूवार हाताने चोळत लेप काढून टाका आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

तुम्ही जेव्हा हा लेप काढाल तेव्हा त्यासोबत टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा छान मुलायम, स्वच्छ होईल. बदाम आणि केशराच्या इफेक्टमुळे त्वचेवर छान सोनेरी चमकदार ग्लो येईल.

 

Web Title: almond kesar face mask at home, how to make badam kesar face pack for radiant glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.