सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. वातावरणातील उष्णता आणि वाढत्या गरमीमुळे घराबाहेर पडणे नकोसे वाटते. उन्हाळ्यातील उष्णतेचा आणि प्रखर सूर्यप्रकाशाचा आपल्या त्वचा आणि केसांवर (Alia Bhatt Favourite Beauty Secret) थोडाफार परिणाम होतोच. उन्हाच्या झळा आपले केस आणि त्वचेचे (How To Use Multani Mitti In Summers) आरोग्य व सौंदर्य बिघडवतात. यामुळेच आपल्यापैकी अनेकजणी उन्हाळ्यात घराबाहेर पडणे फारसे टाळतात(Alia Bhatt Summer Skin & Hair Care Routine).
ऊन आणि सूर्यप्रकाशामुळे केस आणि त्वचा चिकट तेलकट होते. इतकेच नाही तर त्वचेवर पुरळ - खाज येणे, त्वचा लालसर होणे तर केस तेलकट होऊन गळू लागणे, अशा अनेक समस्या सतावतात. अशा परिस्थितीत, आपण त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करून पाहतो. या उपायांमध्ये आपण शक्यतो घरगुती उपायांनाच (Beauty secrets of Alia Bhatt) प्राधान्य देतो. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) देखील उन्हाळ्यात त्वचा व केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपयांमध्ये आयुर्वेदिक मुलतानी मातीचा वापर करते. आलिया उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी इतर कोणत्याही महागड्या प्रॉडक्ट शिवाय मुलतानी माती वापरणेच पसंत करते. उन्हाळ्यात त्वचा आणि केसांसाठी मुलतानी मातीचा वापर नेमका कसा करावा ते पाहूयात.
आलिया त्वचा आणि केसांसाठी वापरते मुलतानी माती...
१. ऑयली त्वचेसाठी :- उन्हाळ्यात आपली त्वचा खूप ऑयली होते. त्वचेवरील जास्तीचे तेल काढून टाकण्यासाठी मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी किंवा काकडीचा रस मिसळून हा फेसपॅक त्वचेवर लावावा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषले जाऊन कमी होते. तसेच उन्हामुळे त्वचेची होणारी जळजळ देखील कमी करण्यास मदत होते.
२. त्वचेला थंडावा मिळण्यासाठी :- ऊन आणि उष्णतेमुळे त्वचा करपून निघते. अशावेळी त्वचेला थंडाव्याची गरज असते. त्वचेला थंडावा मिळवून देण्यासाठी मुलतानी माती आणि चंदन पावडर गुलाब पाण्यांत भिजवून त्याचा फेसपॅक त्वेचवर लावावा. यामुळे उन्हात करपून निघालेली त्वचा शांत होऊन त्वचेला थंडावा मिळतो.
थ्रेडिंग-वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला लावा ‘हा’ स्क्रब, दुखणार नाही-जळजळ आणि खाजही होईल कमी...
३. टॅनिंग काढण्यासाठी :- उन्हाळ्यात स्किन टॅनिंगची समस्या फार कॉमन आहे आणि ती सगळ्यांनाचं त्रास देते. त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी मुलतानी मातीमध्ये लिंबाचा किंवा टोमॅटोचा रस मिसळून त्याचा मास्क तयार करावा. हा तयार मास्क त्वचेवर लावल्याने स्किन टॅनिंगची समस्या दूर होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात अंगाला साबण नका लावू, ‘ही’ पावडर लावा-घामाची दुर्गंधी जाईल,डिओ-परफ्युमची गरजच नाही...
४. त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी :- ऊन आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी मुलतानी मातीमध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावावे. यामुळे त्वचेवरील काळे डाग अगदी सहजपणे दूर होण्यास मदत होते.
५. केसांसाठी :- उन्हाळ्यात केसांमध्ये खूप घाम येऊन केस चिकट तेलकट होतात. यामुळे केसांमधून घामाची दुर्गंधी येऊ लागते. अशावेळी मुलतानी मातीमध्ये एलोवेरा जेल आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा हेअर मास्क केस आणि स्काल्पवर लावून मसाज करावा. या उपायामुळे केस चिकट - तेलकट होत नाही तसेच घामाची दुर्गंधी देखील नाहीशी होते.