भात हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. घरी भात तर वारंवार केला जातोच. भात लावण्यासाठी तांदूळ दोन ते तीनदा पाण्यातून काढून घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का? तांदूळ धुताना निघणारे पाणी हे आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय उपयुक्त नैसर्गिक द्रव आहे. ते पाणी फेकू नका. आपल्याला वाटते की ते पाणी खराब आहे. मात्र तसे नसून खरं तर त्यात अनेक गुणकारी सत्त्वे असतात. तांदळामध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिज द्रव्ये पाण्यात मिसळून त्याला एक प्रकारचे औषधी महत्व देतात.
हे पाणी केसांसाठी विशेषतः उपयुक्त मानले जाते. नियमितपणे केस धुण्यापूर्वी तांदळाचे पाणी वापरल्यास केस मऊ आणि चमकदार होतात. त्यातील स्टार्च केसांची मुळे मजबूत करतो, तुटणे कमी करतो आणि कोरडेपणा दूर करतो. अनेक ठिकाणी पारंपरिक सौंदर्योपचारात याचा समावेश आढळतो. केसांसाठी तांदळाचे पाणी उपयुक्त ठरते. त्यामुळे तांदळाचे पाणी केसांसाठी नक्की वापरा.
केसांबरोबरच त्वचेसाठीसुद्धा हे पाणी उपयोगी आहे. चेहर्यावर हलक्या हाताने लावल्यास त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते. तांदळातील घटक त्वचेला ओलावा देऊन राठपणा कमी करतात आणि डाग धूसर करण्यास मदत करतात. (After Washing rice don't throw away remain water - use rice water for hair and skin )शिवाय तांदळाचे पाणी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे त्वचेला होणारा उष्णतेचा त्रासही कमी होतो.
आणखी एक फायदा म्हणजे रोपांची वाढ. कुंडीतील झाडांनाही हे पाणी चांगले उपयुक्त ठरते. त्यातील नैसर्गिक घटक मातीला पोषण देतात आणि झाडांची वाढ सुधारतात. त्यामुळे हे पाणी फुकट घालवण्यापेक्षा घरच्या विविध उपयोगासाठी ठेवले तर आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. पाणी वापरण्याआधी एकदा स्वच्छ करा किंवा गाळून घ्या.