डॉक्टर रश्मी शेट्टी जिला आपण सेलिब्रिटी त्वचातज्ञ म्हणून ओळखतो.(actresses have fake beauty ?) तिने रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये चाळीशी उलटून गेलेल्या महिलांना फार उपयुक्त असा उपदेश केला आहे. रणवीरने तिला सेलिब्रिटी वय वाढल्यावरही सुंदर कसे दिसतात? (actresses have fake beauty ?) त्यांच्या त्त्वचेवर आपल्याला कधीच कोणते डाग किंवा साध्या सुरकुत्याही का दिसत नाहीत? सतत सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात मानसिक अशांता निर्माण होते का? असा प्रश्न केला.
त्यावर तिने फारच सुंदर उत्तर दिले आहे. ती म्हणाली, “त्यांना सुरकुत्या पडत नाहीत असे नाही आहे. त्या सुरकुत्या लपवतात. त्यांचे क्षेत्रचं तसे आहे.(actresses have fake beauty ?) चेहऱ्यावर बरेच प्रयोग सेलिब्रिटी करत असतात. पण त्यांना बघून स्वतःच्या चेहर्याबद्दल वाईट वाटून घेणार्या महिलांना मला काहीतरी सांगावसे वाटते. अभिनेत्रींना बघून त्या चाळीशीत किती सुंदर दिसतात आणि मी फार वाईट दिसते. असा विचार करणाऱ्या अनेक जणी आहेत.(actresses have fake beauty ?) त्यांना मी सांगू इच्छित, जे तुम्ही बघत आहात ते सत्य नाही. तारुंण्यात ती अभिनेत्री जशी दिसायची तेच तिचे खरे सौदर्य होते. आपण बाकीच्यांपेक्षा कुरूप दिसतो, या विचाराने त्रास करुन घेण्यात काहीच अर्थ नाही.”
जर अभिनेत्री पंन्नाशीत सुंदर दिसते तर मी का नाही? या विचाराने अनेक जणी डॉक्टरांकडे उपचारांसाठी फेऱ्या मारतात. तुम्ही ज्यांना बघत आहात त्या नुसत्या उपचारांनी सुंदर दिसत नाहीत. त्वचेवर उपचार केल्यावर त्या प्रचंड मेकअप करतात. त्यांच्या फोटोत त्या जशा दिसतात, त्यासाठी लाईट इफेक्टस, टचअप, एडिटींग आणि बरंच काही कारणीभूत आहे. मेकअप केल्यानंतर त्यांचे फोटो तुमच्या पर्यंत पोहचतात. त्या प्रत्यक्षात दिसायला वेगळ्या असतात. त्यामुळे स्वतःबद्दल वाईट वाटून घेण्यात काहीच अर्थ नाही.
चेहऱ्याची काळजी करत बसल्याने आत्मविश्वास कमी होतो. अभिनेत्रींच्या क्षेत्रात त्यांना चेहऱ्याची अतिकाळजी करणे गरजेचे असते. पण आपल्याला ज्याचा हेवा वाटतो तो त्यांचा चेहरा खरा नाही , हे लक्षात ठेवा. म्हातारपणातही तरुण दिसण्यासाठी सतत काहीतरी करणाऱ्या अभिनेत्रींचे वयसुद्धा एका वेळेनंतर दिसून येतेच. कारण वय वाढताना चेहरा बदलतोच. ते नैसर्गिक आहे. ते टाळता येणार नाही.