Join us

जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट- त्वचा काेरडी पडू नये म्हणून तांदूळ आणि ओट्सचा 'असा' करा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2024 17:31 IST

Actress Juhi Parmar Suggests Remedies For Soft Skin: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून तांदूळ आणि ओट्स कशा पद्धतीने वापरावे याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ अभिनेत्री जुही परमारने सोशल मिडियावर शेअर केला आहे.(best home remedy for dry skin)

ठळक मुद्देत्वचा कोरडी पडू नये म्हणून जुहीने एक खूप सोपा उपाय सुचविला असून तो करण्यासाठी आपल्याला अवघे ३ पदार्थ लागणार आहेत.

अभिनेत्री जुही परमार (Juhi Parmar) सोशल मिडियावर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असते. वेगवेगळ्या ब्यूटी टिप्स, रेसिपी असं बरंच काही ती सोशल मिडियावर शेअर करते. यापैकी तिने सांगितलेल्या ब्यूटी टिप्स तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. त्या खरोखरच करून बघायला सोप्या असतात आणि त्यामुळे लगेचच त्वचेवर किंवा केसांवर खूप छान परिणाम दिसून येतो, असंही तिचे चाहते नेहमीच म्हणतात. आता पुन्हा एकदा जुहीने एक घरगुती उपाय सुचविला आहे (Actress Juhi Parmar suggests remedies for soft skin). हिवाळ्यात त्वचा काेरडी पडते. त्यासाठी तांदूळ आणि ओट्स नेमके कशा पद्धतीने वापरावे (best home remedy to get rid of dry skin) याविषयी तिने माहिती सांगितली आहे.(how to get rid of dry skin?)

 

त्वचा कोरडी पडू नये म्हणून काय उपाय करावा?

त्वचा कोरडी पडू नये म्हणून जुहीने एक खूप सोपा उपाय सुचविला असून तो करण्यासाठी आपल्याला अवघे ३ पदार्थ लागणार आहेत.

फक्त २ ब्लाऊज शिवा- काठपदर, डिझायनर सगळ्याच साड्यांवर शोभून दिसतील, शिलाईचे पैसेही वाचतील

हा उपाय करण्यासाठी १ चमचा तांदूळ घ्या. ते दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून एका वाटीमध्ये ४ ते ५ तासांसाठी भिजत ठेवा. 

तांदूळ भिजल्यानंतर त्या वाटीमध्ये १ चमचा ओट्स आणि थोडं गरम पाणी टाका. त्यानंतर वाटीवर झाकण ठेवून १० मिनिटांसाठी तसेच राहू द्या.

 

त्यानंतर वाटीमधले ओट्स, तांदूळ आणि पाणी गाळणीने गाळून घ्या. आता जे पाणी वाटीमध्ये राहिलं असेल त्या पाण्यात दिड ते दोन चमचे ॲलोव्हेरा जेल टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवा. 

कानातल्यांची नवी फॅशन: हत्ती झुमका कानातल्यांचे ८ सुंदर पॅटर्न्स, पाहा एकापेक्षा एक आकर्षक डिझाईन्स

त्यानंतर आता तयार झालेलं हे घरगुती क्रिम तुमच्या चेहऱ्याला, मानेला, गळ्याला आणि हातांना लावा. यामुळे त्वचेला खूप छान पोषण मिळेल. त्वचा मॉईश्चराईज होऊन अगदी मऊ पडेल. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा त्रास होऊ नये म्हणून हा उपाय लगेचच करून पाहायला हवा.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी