Lokmat Sakhi >Beauty > ५५ वर्षांच्या भाग्यश्रीचा चेहरा एवढा सुंदर आणि तरुण कसा? बघा तिनेच सांगितलंय त्यामागचं सिक्रेट.... 

५५ वर्षांच्या भाग्यश्रीचा चेहरा एवढा सुंदर आणि तरुण कसा? बघा तिनेच सांगितलंय त्यामागचं सिक्रेट.... 

Beauty Secret Of Bhagyashree's Wrinkle Free Skin: वयाच्या ५५ व्या वर्षीही अभिनेत्री भाग्यश्री आणि तिचं सौंदर्य हा अनेकांसाठी चर्चेचा विषय आहे. बघा ती स्वत:च यामागचं सिक्रेट सांगते आहे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 02:49 PM2024-05-16T14:49:47+5:302024-05-16T14:50:57+5:30

Beauty Secret Of Bhagyashree's Wrinkle Free Skin: वयाच्या ५५ व्या वर्षीही अभिनेत्री भाग्यश्री आणि तिचं सौंदर्य हा अनेकांसाठी चर्चेचा विषय आहे. बघा ती स्वत:च यामागचं सिक्रेट सांगते आहे....

actress bhagyashree's skin care routine, beauty secret of bhagyashree's wrinkle free skin | ५५ वर्षांच्या भाग्यश्रीचा चेहरा एवढा सुंदर आणि तरुण कसा? बघा तिनेच सांगितलंय त्यामागचं सिक्रेट.... 

५५ वर्षांच्या भाग्यश्रीचा चेहरा एवढा सुंदर आणि तरुण कसा? बघा तिनेच सांगितलंय त्यामागचं सिक्रेट.... 

Highlightsतिने जो उपाय सांगितला आहे तो ती नियमितपणे करते आणि तेच तिच्या सुंदर- तरुण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरकुत्या नसलेल्या त्वचेचं रहस्य आहे, असं ती सांगते.

'मैने प्यार किया' या ब्लॉकबस्टर सिनेमातून रसिकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. या चित्रपटात तिच्या सोबत होत सलमान खान. आता दोघांच्याही वयाचा विचार केला तर सलमान खानच्या चेहऱ्यावर त्याच्या वाढत्या वयाच्या खाणाखुणा दिसायला लागल्या आहेत. पण अभिनेत्री भाग्यश्रीचं मात्र तसं नाही. ती तर अजूनही तेवढीच सुंदर आणि तरुण दिसते. खूप छान पद्धतीने तिने स्वत:ला मेंटेन केलं आहे (actress bhagyashree's skin care routine). तिचा अजिबातच सुरकुत्या नसलेला चेहरा पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधता येणंही कठीण आहे. यासाठी ती नेमकं काय करते, याविषयी बघा तिनेच सांगितलेली ही खास माहिती... (actress bhagyashree's skin care routine)

 

अभिनेत्री भाग्यश्री मागच्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण तरीही तिने तिचा चाहता वर्ग टिकवून ठेवला आहे. एवढंच नाही तर सोशल मिडियाच्या माध्यमातूनही ती नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. आठवड्यातून एकदा ती ब्यूटी, फूड, फिटनेस याविषयीच्या खास टिप्सही देत असते.

नाश्त्यासाठी रोज काय करावं प्रश्नच पडतो? ७ हेल्दी- चटपटीत पदार्थ, झटपट होतील सगळ्यांना आवडतील

आता नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये तिने तिच्या मॉर्निंग रुटीनविषयी माहिती दिली आहे. यामध्ये तिने जो उपाय सांगितला आहे तो ती नियमितपणे करते आणि तेच तिच्या सुंदर- तरुण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरकुत्या नसलेल्या त्वचेचं रहस्य आहे, असं ती सांगते.

 

अभिनेत्री भाग्यश्रीच्या स्किन केअर टिप्स...

व्हिडिओमध्ये भाग्यश्री असं सांगते आहे की ती दररोज सकाळी चेहऱ्याला ओट्स, मध आणि दूध यांचा फेसपॅक लावून काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करते आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाकते.

दिल्लीकरांनो आता बस्स!! इडलीसोबत केलेला 'हा' भयंकर प्रकार पाहून इडलीप्रेमी चिडले, व्हिडिओ व्हायरल

या तिन्ही घटकांमुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. पण भाग्यश्री फक्त एवढंच करते असं नाही. ती नियमितपणे योगा, व्यायाम करते. शिवाय आहाराच्या बाबतीतही ती अतिशय काटेकोर आहे. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम तिच्या सौंदर्यावर आणि फिटनेसवर दिसून येतो. 

Web Title: actress bhagyashree's skin care routine, beauty secret of bhagyashree's wrinkle free skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.