Join us

ऐश्वर्या नारकर सांगतात लांबसडक केसांचे - नितळ त्वचेचे रहस्य, १ सोपा उपाय; लांब केसांसाठी खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2024 14:06 IST

Actress Aishwarya Narkar reveals her Hair and skin secret home remedy : महागड्या ट्रिटमेंटसपेक्षा घरच्या घरी केलेले नैसर्गिक उपाय केव्हाही जास्त चांगले...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचे सौंदर्य वयाच्या पन्नाशीतही तरुणींना लाजवेल असे आहे. त्यांची फिगर, त्वचेचा पोत आणि लांबसडक केस यांमुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते. आपल्या दमदार अभिनयाने त्या रसिकांच्या लाडक्या आहेतच पण या वयातही त्यांच्या सौंदर्यावर फिदा असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यामागे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या नियमित करत असलेला व्यायाम, आहार हे असल्याचे दिसते. इन्स्टाग्रामवर त्या अनेकदा आपल्या व्यायामाचे व्हिडिओ शेअर करत असतात. यामध्ये वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्या थकवणारे आणि स्नायू बळकट करणारे व्यायामप्रकार करताना दिसतात (Actress Aishwarya Narkar reveals her Hair and skin secret home remedy). 

यासोबतच ऐश्वर्या आपल्या स्कीन केअर आणि हेअर केअर बद्दलच्या काही गोष्टीही आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर हेअर केअरशी निगडीत असलेला एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी आपल्या लांबसडक केसांचे आणि नितळ त्वचेचे सिक्रेट शेअर केले आहे. केसगळती, केस पांढरे होणे, केस विरळ होणे अशा समस्या सध्या तरुण वयातच आपल्याला हैराण करत असताना वयाच्या या टप्प्यावरही ऐश्वर्या नारकर यांचे गुडघ्याच्याही खालपर्यंत असलेले मोठे केस आणि नितळ त्वचा पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पाहूयात केसांचे आणि त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि ऐश्वर्या नेमका कोणता नैसर्गिक उपाय करतात. 

उपाय काय? 

कोरफडीचा गर (aloe vera gel for natural Beauty) हा त्वचा, केस अशा सगळ्यांसाठीच अतिशय उपयुक्त असतो हे आपल्याला माहित आहे. त्यामुळेच बऱ्याचशा सौंदर्यप्रसाधनांमध्येही कोरफडीचा वापर केलेला असतो. पण त्यापेक्षा थेट कोरफडीचे एक पान घेऊन ते कापले आणि त्यातला नैसर्गिक गर हाताने काढला तर तो जास्त चांगला. हा गर काढून हातानेच तो थेट केसांच्या मुळांशी लावावा.

यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास, केसांना चमक येण्यास मदत होते. तसेच हाच गर चेहऱ्यावरही लावला तर त्वचा नितळ आणि मुलायम दिसते. ऐश्वर्या नारकर व्हिडिओमध्ये हातानेच हा गर केसांच्या मुळांशी आणि चेहऱ्यावर लावताना दिसत आहेत. त्यामुळे अतिशय सोपा असा हा उपाय आपणही घरच्या घरी नक्की ट्राय करु शकतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजीहोम रेमेडीऐश्वर्या नारकर