Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरची पुरळ जाता जात नाही? वरवरची मलमपट्टी सोडा, पुरळ येण्याचे कारण असते गंभीर

चेहऱ्यावरची पुरळ जाता जात नाही? वरवरची मलमपट्टी सोडा, पुरळ येण्याचे कारण असते गंभीर

Acne on face won't go away? : चेहऱ्यावरील पुरळ जात नसेल तर कारणे जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2025 17:50 IST2025-01-15T17:46:37+5:302025-01-15T17:50:04+5:30

Acne on face won't go away? : चेहऱ्यावरील पुरळ जात नसेल तर कारणे जाणून घ्या.

Acne on face won't go away? | चेहऱ्यावरची पुरळ जाता जात नाही? वरवरची मलमपट्टी सोडा, पुरळ येण्याचे कारण असते गंभीर

चेहऱ्यावरची पुरळ जाता जात नाही? वरवरची मलमपट्टी सोडा, पुरळ येण्याचे कारण असते गंभीर

प्रत्येकाच्या चेहर्‍यावर कधीनाकधी पुरळ येतेच. त्यात काही फार घाबरण्याची किंवा मोठ्या उपचाराची गरज नसते. साधारणपणे पाळीच्या पुढे मागे महिलांना पुरळ, पिंपल्स येतात.(Acne on face won't go away?) पुरुषांनाही पुरळ उठते. काही काळाने जाते. त्यासाठी वेगळी औषधे वगैरे घ्यावी लागत नाहीत. पण काही जणांचा चेहरा कायम पुरळाने भरलेला असतो. काहींच्या नाकावर तर, काहींच्या कपाळावर. काहींच्या गालावर तर, काहींच्या हनुवटीवर पुरळ कायमच असते. चेहर्‍याच्या वेगवेगळ्या भागांवर येणारे पुरळ वेगवेगळ्या समस्यांमुळे येते. हे पुरळ कितीही फेशीयल केलं तरी जात नाही. (Acne on face won't go away?)कारण पुरळाच्या समस्येचे मुळ चेहरा नसून, शरीराच्या अंर्तप्रक्रियांमधील बिघाड आहे.   

चेहरा खराब दिसतो, म्हणून आत्मविश्वास कमी होतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की तुमच्या चेहर्‍यात काहीच खराबी नसून, शरीरप्रक्रियांमध्ये आहे. पुरळ फक्त हार्मोनल बदल किंवा प्रदूषणामुळे येत नाही. त्वचातज्ज्ञ सांगतात, जर पुरळ येते आणि जाते तर ते नैसर्गिक आहे.(Acne on face won't go away?) पण आलेले पुरळ जातच नसेल तर, शरीरात काहीतरी चुकीचे घडत आहे. दुर्लक्ष करू नका. लक्षणे समजून घ्या. त्यावरती उपाय करा. समस्येचे निवारण झाले की, पुरळही निघून जाईल. पुरळ चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर येते. प्रत्येक भाग वेगळी समस्या दर्शविते. पुरळाची चेहर्‍यावरील जागा सांगते की, कोणती शरीर प्रक्रिया सुरळीत होत नाही.

१. जर तुमच्या कपाळावर पुरळ आहे. दिसयला जर ते व्हाईटहेड्स सारखे आहे. तर तुमच्या  केसात नक्कीच डॅन्डरफ आहे. त्यामुळे कपाळावर पुरळ आहे. पण जर पुरळ पिंपल्ससारखे आहे. लाल आहे. तर लिव्हरची समस्या असण्याची शक्यता आहे.

२. जर तुमच्या गालावर पुरळ आहे. तर आतड्यांमध्ये गडबड असण्याची शक्यता आहे.

३.हनुवटीवर जर पुरळ आहे. जे जाता जात नाही. तर हे हार्मोनल असमोतलाचे लक्षण आहे. अनेक महिलांमध्ये असे अढळून येते.

४. नाकावर जर पुरळ उठले असेल तर, तुमचा रक्तप्रवाह नीट होत नसल्याची शक्यता आहे. पचनसंस्थादेखील नीट कार्य करत नाही.

तुम्हालाही जर असे पुरळ असेल तर वैद्यकीय मदत घ्या. शरीर प्रक्रिया सुरळीत होणे फार महत्त्वाचे असते.  

Web Title: Acne on face won't go away?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.