Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात चेहऱ्याला 'या' पद्धतीने लावा आमसुलाचा थंडगार लेप- टॅनिंग, पिगमेंटेशन जाऊन त्वचा उजळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2026 14:44 IST

Amsul Face Mask to Reduce Tanning and Pigmentation: चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन आणि टॅनिंग कमी करण्यासाठी पुढे सांगितलेल्या पद्धतीनुसार आमसुलाचा लेप करून त्वचेला लावून पाहा..(home hacks to get rid of tanning and dead skin)

उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा खूप टॅन होते. तुम्ही घराबाहेर पडताना चेहरा कितीही झाकून ठेवला किंवा सनस्क्रिनचा वापर केला तरी कडक उन्हाचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचा काळवंडून जाते. शिवाय हल्ली पिगमेंटेशनचा त्रासही अनेक जणींना होतो आहे. पिगमेंटेशन आणि त्वचेवरचं टॅनिंग कमी करायचं असेल तर एकदा आमसुलाचा फेसमास्क ट्राय करून पाहा. आमसूल आपल्या शरीरासाठी थंड असतं. आता त्याच आमसुलाचा गारवा तुमच्या त्वचेलाही द्या. त्वचेमध्ये खूप छान बदल जाणवेल (Amsul Face Mask to Reduce Tanning and Pigmentation). त्यासाठी आमसुलाचा लेप नेमका कसा तयार करायचा ते पाहुया..(home hacks to get rid of tanning and dead skin)

 

त्वचेसाठी आमसुलाचा फेसमास्क कसा तयार करावा?

त्वचेसाठी आमसुलाचा वापर कसा करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. पुढील प्रकारे तुम्ही आमसूल फेसपॅक तयार करून त्वचेला लावू शकता.

१. सगळ्यात आधी तर आमसूल स्वच्छ धुवून कोमट पाण्यात भिजत घाला. त्यानंतर त्याची पेस्ट करून घ्या आणि त्वचेवर ज्या भागात पिगमेंटेशन झालेले आहे त्या ठिकाणी लावा. ५ ते ७ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावा.

 

२. आमसूलाची पेस्ट आणि ताज्या कोरफडीचा गर सम प्रमाणात एकत्र करा. आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर ८ ते १० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. पिगमेंटेशन आणि टॅनिंग दोन्हीही कमी होण्यास मदत होईल.

इनडोअर प्लांट्स सुकून जातात- पानं पिवळी पडतात? ४ टिप्स- राेपं नेहमीच राहतील टवटवीत, हिरवीगार

३. आमसूल ज्या पाण्यामध्ये भिजवलेलं आहे ते पाणी टाकून देऊ नका. कारण त्याचाही वापर त्वचेसाठी करता येतो. यासाठी आमसुलाच्या पाण्यात कापूस बुडवून तो चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स यावर लावा. ३ ते ५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हे सगळे उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावे. हे सगळे उपाय करण्यापुर्वी पॅच टेस्ट जरूर घ्या. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Amsul face mask for tan removal and brighter skin this summer.

Web Summary : Amsul (kokum) face masks can reduce tanning and pigmentation. Recipes include amsul paste, aloe vera mix, or amsul-soaked cotton application. Patch test recommended.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी