आपल्या शरीरावरील अतिरिक्त केस काढून टाकण्यासाठी विशेष करुन स्त्रिया वॅक्सिंग, थ्रेडींगचा पर्याय निवडतात. अनेकदा स्त्रिया आपल्या प्रायव्हेट पार्ट्सवरचे केस काढण्यासाठी विविध प्रकारच्या क्रिम्स व टूल्सचा वापर करतात. बहुतेक महिला या शरीराच्या कोणत्याही भागाचे वॅक्सिंग करायचे म्हटले की शक्यतो रेंजर किंवा हेअर रिमूव्हल क्रिमचा वापर करतात. परंतु असे करताना निकृष्ट दर्जाचे रेजर वापरल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासोबतच व्हजायनल इंन्फेक्शनसचा धोका उद्भवू शकतो. काहीवेळा त्या नाजूक भागाचे वॅक्सिंग करताना देखील त्या भागावर छोट्या - मोठ्या जखमा होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचा धोका टाळण्यासाठी म्हणून काही स्त्रिया बिकिनी वॅक्सिंगचा (Bikini Waxing) पर्याय निवडतात.
महिला प्रायव्हेट जागा स्वच्छ राहावी म्हणून बिकिनी वॅक्स (Bikini Waxing) करतात. परंतु बिकिनी वॅक्सिंग करताना थोडीशी चूक देखील त्वचेवर पुरळ, मुरुम, संसर्गाचा धोका वाढवू शकते. यामुळे जर आपण पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स (Bikini Wax) करत असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे. बिकिनी वॅक्स करणे हा पूर्णपणे तुमचा स्वतःचा निर्णय असावा, तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्ती ते करून घेत आहेत किंवा पार्लरची मधील व्यक्ती पाठी लागत आहे म्हणून करत असाल तर असे करु नका(7 Tips To Help You Prepare For Your First Bikini Wax).
बिकिनी वॅक्स (Bikini Wax) म्हणजे काय ?
नावाप्रमाणेच, या वॅक्सिंगच्या प्रकारात आपल्या बिकिनी म्हणचे प्रायव्हेट पार्टस आसपासच्या भागाची वॅक्सिंग केली जाते. थोडक्यात आपल्या प्रायव्हेट पार्टस व त्या आजूबाजूच्या भागवरचे केस काढणे. बरेच लोक वॅक्सिंग ऐवजी शेव्हिंग, हेअर रिमूव्हल क्रिम आणि ट्रिमरने केस काढण्यास प्राधान्य देतात. परंतु, शरीराच्या केसांप्रमाणे या भागासाठीही वॅक्सिंग हा दीर्घकालीन उपाय आहे. कायमस्वरूपी प्यूबिक हेअर काढण्यासाठी काहीजणी रेजर किंवा इतर हेअर रिमूव्हल प्रॉडक्ट्सचा देखील वापर करतात.
आयब्रो करताना वेदना होवू नयेत म्हणून ७ टिप्स, आग होणे विसरा आणि करा न घाबरता आयब्रो...
वॅक्सिंग केल्यावरही त्वचेवर बारीक बारीक टोकदार केस येतात? ५ टिप्स- इनग्रोन हेअरचा त्रास कमी...
बिकिनी वॅक्सिंग करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ?
१. वॅक्सिंग करण्यापूर्वी योगा किंवा स्ट्रेचिंग करा. यामुळे वॅक्सिंग करताना पायांचे स्नायू लवचिक राहतील आणि वॅक्सिंग करणे सोपे होईल. वॅक्सिंगनंतर १ ते २ दिवस जड वर्कआउट करू नका.
२. जर तुम्ही पहिल्यांदा किंवा खूप दिवसांनी बिकिनी वॅक्सिंग करणार असाल तर केस आधी थोडे ट्रिम करा. असे केल्याने बिकिनी वॅक्सिंग करणे सहज सोपे होऊन जाईल.
३. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. वॅक्सिंग ऍप्लिकेटर किंवा स्पॅटुला स्वच्छ असल्याची खात्री करा.
४. एकाच वेळी खूप केस काढण्याचा प्रयत्न केल्याने केस अधिक लवकर तयार होतात आणि पुरळ उठू शकते.
५. जर तुम्हाला वेदना अजिबात सहन होत नसेल तर आपण त्या भागावर नंबिंग क्रिम वापरू शकता. कृपया ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
५. मासिक पाळी सुरू होण्याच्या ३ ते ४ दिवस आधी आणि समाप्तीनंतर ३ ते ४ दिवसांनी वॅक्सिंग करु नका, या काळात त्वचा खूप संवेदनशील असते आणि वेदना देखील अधिक होतात.
अप्पर लिप्स करताना खूप दुखते, रॅश येते? ५ टिप्स- न दुखता करता येतील अप्पर लिप्स...
६. वॅक्सिंगनंतर २ ते ३ दिवस घट्ट अंडरगारमेंट घालू नका, असे केल्याने पुरळ उठू शकते.
७. वॅक्सिंगनंतर पुरळ, वेदना आणि जळजळ रोखण्यासाठी, कोरफड जेल लावा किंवा बर्फ कापडात गुंडाळून त्या भागावर लावा.