Lokmat Sakhi >Beauty > आयब्रो करताना वेदना होवू नयेत म्हणून ७ टिप्स, आग होणे विसरा आणि करा न घाबरता आयब्रो

आयब्रो करताना वेदना होवू नयेत म्हणून ७ टिप्स, आग होणे विसरा आणि करा न घाबरता आयब्रो

7 Super Easy Hacks That Make Eyebrow Threading & Plucking Completely Painless : आयब्रो केल्याने चेहेऱ्याला येणाऱ्या छान लूकमुळे ते करावेसे वाटतात, पण ते करताना होणाऱ्या वेदनेमुळे काही स्त्रियांना आयब्रो करणे म्हणजे मोठं संकटच वाटत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 05:48 PM2022-12-17T17:48:49+5:302022-12-17T17:54:20+5:30

7 Super Easy Hacks That Make Eyebrow Threading & Plucking Completely Painless : आयब्रो केल्याने चेहेऱ्याला येणाऱ्या छान लूकमुळे ते करावेसे वाटतात, पण ते करताना होणाऱ्या वेदनेमुळे काही स्त्रियांना आयब्रो करणे म्हणजे मोठं संकटच वाटत.

7 Super Easy Hacks That Make Eyebrow Threading & Plucking Completely Painless | आयब्रो करताना वेदना होवू नयेत म्हणून ७ टिप्स, आग होणे विसरा आणि करा न घाबरता आयब्रो

आयब्रो करताना वेदना होवू नयेत म्हणून ७ टिप्स, आग होणे विसरा आणि करा न घाबरता आयब्रो

डोळ्यांवरील भुवया हा विषय जितका नाजूक आहे तितक्याच भुवयासुद्धा नाजूक असतात. भुवयांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. भुवया हा चेहेऱ्यावरील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्या चेहेऱ्याच्या सुंदरतेत भर पाडण्यात भुवयांचे मोठं योगदान आहे. भुवयांचे केस वाढल्यावर त्या विचित्र दिसतात. भुवयांना व्यवस्थित शेप करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो. जर भुवया चेहेऱ्याच्या आकारानुसार, कधी जास्त किंवा बारीक कोरल्या गेल्या असतील तरीदेखील चेहेऱ्याचा लूक खराब होतो. त्यामुळे आयब्रो करताना त्या नीट कोरण गरजेचं असून, त्यामुळे चेहेऱ्याला उठावदार लूक येतो. आयब्रो केल्याने चेहेऱ्याला येणाऱ्या छान लूकमुळे ते करावेसे वाटतात, पण ते करताना होणाऱ्या वेदनेमुळे काही स्त्रियांना आयब्रो करणे म्हणजे मोठं संकटच वाटत. आयब्रो करताना होणाऱ्या वेदनेला कमी करण्यासाठी काही खास टिप्स.. यामुळे तुम्ही बिनधास्तपणे वेदनाविरहित आयब्रो करू शकता. (7 Super Easy Hacks That Make Eyebrow Threading & Plucking Completely Painless).

आयब्रो करताना होणाऱ्या वेदनेला असे करा कमी... 

१. आंघोळ झाल्यानंतर आयब्रो करावे - जर तुम्ही थ्रेडींग,प्लकिंग किंवा वॅक्सिंगचा वापर करून आयब्रो करणार असाल तर आंघोळ झाल्यानंतर आयब्रो करा. आंघोळ केल्यानंतर भुवयांच्या भागातील हेअर फॉलिकल्स ओपन होतात. त्यामुळे भुवयांचे केस सहजरित्या निघतात. 

२. जुन्या साधनांचा वापर करू नये - आयब्रो करताना जर तुम्ही प्लकर वापरत आहात. तर जुने किंवा गंजलेले प्लकर वापरणे टाळा. यामुळे तुमच्या डोळ्यासारख्या नाजूक भागाला इजा होण्याची शक्यता असते. 

३. मॉइश्चरायजर क्रीम्सचा वापर - आयब्रो करण्यापूर्वी व केल्यानंतर त्या भागावर मॉइश्चरायजर वापरायला विसरू नका. मॉइश्चरायजरने तुमची स्किन मऊ पडेल व आयब्रो करताना फार दुखणार नाही. 

४. बर्फाचा वापर - आयब्रो करताना जर तुम्हाला जास्त वेदना होत असतील. अश्यावेळी आयब्रो करण्यापूर्वी त्या भागावर बर्फाचा शेक द्यावा. जेणेकरून बर्फाने तुमची स्किन सुन्न पडेल व आयब्रो करताना तुम्हाला जास्त वेदना होणार नाहीत.      

     

५. मालिश करा - आयब्रो करण्यापूर्वी जी भुवई तुम्ही कोरणार आहात त्या भुवईला बोटांच्या साहाय्याने जोर देऊन मालिश करून घ्या. यामुळे त्या भागातील हेअर फॉलिकल्स लूज पडून भुवयांचे केस सहजरित्या काढता येतील. तसेच जास्त वेदनेचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. 

६. जेलचा वापर - आयब्रो करून झाल्यानंतर त्या भागावर थंड कोरफडीचे जेल लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. 

७. भुवयांचे केस काढण्याची योग्य पद्धत - जर तुम्ही प्लकिंगचा वापर करून आयब्रो करणार असाल तर, भुवयांच्या केसांना हलकेच वरून न खेचता त्या केसांच्या रूट्स पासून खेचून वेगळे काढा. यामुळे वेदना कमी होऊन आयब्रोला व्यवस्थित शेप येईल.

Web Title: 7 Super Easy Hacks That Make Eyebrow Threading & Plucking Completely Painless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.