आपण आजकाल सगळंच घरी तयार करायचा प्रयत्न करतो. कारण विकतच्या गोष्टींमध्ये रसायनांचे प्रमाण खूप जास्त असते. (6 Homemade Body Washes, Deep Cleaning at Home, Parlor-Like Glow at Zero Cost!)हे आपल्याला कळून चुकले आहे. त्यामुळे जेवढ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करता येईल तेवढा करावा. केसांसाठी आपण घरगुती उपाय करतोच. तसेच त्वचेसाठीही करतो. इतरही गोष्टींसाठी आपण पर्यायी मार्ग शोधतो. असेच नैसर्गिक पर्याय कंटेन्ट क्रिएटर शेरली थॉमसन तिच्या पेजवर शेअर करत असते. तिने ४ घरगुती बॉडी वॉश शेअर केले आहेत. (6 Homemade Body Washes, Deep Cleaning at Home, Parlor-Like Glow at Zero Cost!)चला तर बघूया काय आहेत हे पर्याय उपाय. घरीच तयार करा आणि वापरा.
१. आयुर्वेदिक उटणं
एका मिक्सरच्या भांड्यात थोडे हिरवे मूग घ्या. त्यात बकुळाची सुखवलेली फुले घाला. त्यात चंदनाची पावडर घाला. गुलाबाच्या पाकळ्या सुखवून त्याही घाला. चांगल्या कंपनीची हळद घ्या. तीही मिश्रणात घाला. आता सगळं मिक्सर मध्ये वाटून घ्या. त्याची मस्त पावडर तयार होईल. शरीर स्वच्छ करण्यासाठी ही पावडर वापरा. डिपक्लिनींगसाठी उपयुक्त आहे.(6 Homemade Body Washes, Deep Cleaning at Home, Parlor-Like Glow at Zero Cost!)
२. हर्बल बाथ पावडर
शरीरावर कोणती अॅलर्जी वगैरे उठू नये म्हणून ही पावडर वापरा. एका मिक्सरच्या भांड्यात बेसन घ्या. त्यात कडुलिंबाचा पाला सुखवून घाला. पांढरी हळद घाला. नट ग्रास रुट मिळाले तर वापरा. तरवडाची फुले घाला. गुलाबाच्या सुखलेल्या पाकळ्या वापरा. त्यात वाळा घाला.
३. ब्रायटनिंग पावडर
ही फारच सोपी आहे. शरीराचे टॅनिंग कमी करण्यासाठी याची मदत होईल. मिक्सरच्या भांड्यात ओट्स घ्या. त्यात चंदन पावडर घाला. त्यात संत्र्याची सुखलेली साले घाला. छान वाटून घ्या.
४. डेड स्किन रिमुव्हर
त्वचा खराब झाली असेल तर, ती स्वच्छ करण्यासाठी ही पावडर वापरा. मिक्सरच्या भांड्यात वाळवलेल्या रिठांची पावडर, आवळा पावडर, कॉफी पावडर, शिकेकाई पावडर घ्या. एकत्र वाटून घ्या. त्यात थोडं पाणी घालून पेस्ट करा. आणि वापरा.
सगळ्याच पावडर वापरताना थोड्या पाण्याचा वापर करुन त्यांची पेस्ट तयार करा. मग ती पेस्ट शरीराला चोळून लावा. नंतर थोडावेळ तशीच ठेवा. मग धुवून टाका.