इतर ऋतूंपैकी शक्यतो उन्हाळ्यातच त्वचेसंबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता, गरमी, रणरणते ऊन याचा त्वचेवर कमी - अधिक प्रमाणांत फरक पडतोच. या ऋतूंत सतत त्वचेवर येणारा घाम, तेलकट, चिकटपणा यामुळे त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य हरवून जाते. काहीवेळा तर उन्हामुळे ( 5 Ways To Use The Alum Stone For Glowing Skin during summer) त्वचा थकलेली दिसते. अशा परिस्थितीत, त्वचेची काळजी घेणे खूपच गरजेचे असते(how to use fitkari on face for brightening skin).
या दिवसांत त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्वचेमध्ये फरक दिसून येतो. यासाठीच, आपण बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक थंडावा देणाऱ्या क्रीम्स आणि लोशन्स विकत आणतो. असे असले तरीही या क्रीम्स आणि लोशन्स मधील रसायन त्वचेला अपायकारक ठरू शकतात. अशावेळी आपल्याकडे पूर्वीपासून वापरात असलेली तुरटी ही नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय म्हणून अतिशय फायदेशीर ठरते. तुरटी त्वचा थंड ठेवते, बॅक्टेरिया दूर करते आणि त्वचेचा पोत सुधारते. उन्हाळ्यातील घाम, पुरळ, खाज, त्वचेची दुर्गंधी यावर ही इवलीशी तुरटी जबरदस्त काम करते, यासाठीच उन्हाळ्यातील त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुरटी कोणत्या ५ पद्धतींनी वापरु शकतो ते पाहूयात.
उन्हाळ्यातही त्वचा राहील मुलायम आणि चमकदार, फक्त तुरटीचा करा असा वापर...
१. तुरटीचे पाणी :- सकाळी उठल्यानंतर थंड तुरटीच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. एक लिटर पाण्यात १ चमचा तुरटी पावडर मिसळा. या पाण्याने त्वचा धुतल्यास त्वचा खोलवर स्वच्छ होते, ओपन पोर्स बंद होतात आणि त्वचेतील जास्तीचे तेल काढून टाकले जाते.
२. तुरटी गुलाबपाण्याचे टोनर :- उन्हाळ्यात त्वचेला टोनिंग करणे खूप आवश्यक असते. गुलाब पाण्यात तुरटी पावडर मिसळून चेहऱ्यावर लावणे खूप फायदेशीर ठरते. सकाळी चेहरा स्वच्छ केल्यानंतर टोनर म्हणून आपण या पाण्याचा वापर करु शकता. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल आणि चमकदार होईल.
३. मुलतानी माती आणि तुरटी पावडर :- मुलतानी मातीमध्ये तुरटी पावडर आणि गुलाबजल मिसळून फेसपॅक तयार करा. हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर पाण्याने धुवा. या फेसपॅक मधील मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि तुरटी त्वचा आतून स्वच्छ आणि चमकदार बनवते.
स्वतःला लावलेल्या 'या' ६ सवयींमुळेच रेखाचं सौंदर्य आहे खास! वयाच्या सत्तरीतही सुंदरच...
४. बेसन आणि तुरटी :- बेसनात तुरटी पावडर, दूध किंवा दही मिसळून पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट उन्हाळ्यात दररोज सकाळी आंघोळीपूर्वी तुमच्या त्वचेवर लावा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि त्वचा मऊ व चमकदार दिसू लागेल.
५. एलोवेरा जेल आणि तुरटी :- ताज्या एलोवेरा जेलमध्ये चिमूटभर तुरटी पावडर मिसळून चेहऱ्यावर लावणे देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळेल, जळजळ कमी होईल आणि उन्हाळ्यात होणारा त्वचेचा दाह व आग कमी होऊन आराम मिळेल.