Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिळ्या भातानं चमकेल त्वचा, ५ प्रकारे लावा भाताचा पॅक-काचेसारखी कोरियन त्वचा मिळण्याचा सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2025 18:27 IST

best way to use rice for glass skin : 5 Ways To Apply Rice On Face For Korean Glass Skin : घरच्याघरीच उरलेल्या भाताचा वापर त्वचेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने कसा करता येतो ते पाहा...

भात म्हणजे आपल्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भागच...पण हा पांढरंशुभ्र भात खाण्यासोबतच आपल्या त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी देखील तितकाच फायदेशीर ठरतो. कोरियन ब्यूटी रुटीनमध्ये भात आणि तांदळाच्या पाण्याला विशेष महत्व आहे. भातामधील अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन - बी  आणि मिनरल्स त्वचेला आतून पोषण देतात, त्वचेच्या अनेक समस्या कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. अनेक शतकांपासून आशियाई आणि विशेषतः कोरियन सौंदर्य परंपरांमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी भात किंवा तांदळाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. आजकाल जगभरात 'कोरियन ग्लास स्किन' (Korean Glass Skin) या सौंदर्य ट्रेंडची खूप क्रेझ आहे. काचेसारखी नितळ, डागविरहित, आणि आतून चमकणारी त्वचा मिळवणे हे अनेकींचे स्वप्न असते. यासाठी बाजारात महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सवर पैसे खर्च करण्याऐवजी, स्वयंपाकघरात असलेला भात एक सोपा, फायदेशीर आणि असरदार उपाय आहे(5 Ways To Apply Rice On Face For Korean Glass Skin).

तांदळामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, आणि फेरुलिक ॲसिड त्वचेला खोलवर पोषण देतात, सुरकुत्या कमी करतात, त्वचा उजळवतात आणि नैसर्गिकरित्या मुलायम बनवतात. घरच्याघरी भाताचा वापर त्वचेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो जसे की तांदळाचं पाणी, तांदळाचा फेसपॅक किंवा भाताचा फेसमास्क... त्वचेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने भाताचा वापर केल्यास कोरियन ग्लास स्किनसारखी स्वच्छ, पारदर्शक आणि चमकदार त्वचा मिळवणे अगदी सहज शक्य आहे. आपण त्वचेसाठी भाताचा आणि तांदळाचा वापर वेगवेगळ्या सोप्या घरगुती पद्धतींनी कसा करून शकतो ते पाहूयात. 

त्वचेसाठी भाताचा आणि तांदळाच्या पाण्याचा वापर नेमका कसा करावा.... 

१. राईस मिस्ट (तांदळाच्या पाण्याचा स्प्रे) :- राईस वॉटर त्वचेला थंडावा आणि चमक देण्यासाठी फारच फायदेशीर ठरतात. राईस मिस्ट (Mist) तयार करण्यासाठी, तांदूळ उकडवलेले पाणी किंवा तांदूळ भिजवलेले पाणी गाळून घ्या. हे पाणी २ ते ३ दिवस हलके फर्मेन्ट होऊ द्या. फर्मेन्टेशनमुळे त्याचे पौष्टिक गुणधर्म वाढतात. नंतर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि सकाळ - संध्याकाळ फेसमिस्ट म्हणून आपण त्वचेसाठी याचा वापर करू शकता. 

२. राईस फेसपॅक :- हा फेस पॅक तयार करण्यासाठी दळून बारीक केलेल्या तांदुळाची पावडर घ्यावी. प्रत्येकी १ मोठा चमचा बेसन आणि दही घ्या. हे सर्व पदार्थ एकत्र मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक सुखल्यावर, हलक्या हातांनी मसाज करत चेहरा धुवून घ्या. यामुळे त्वचा स्वच्छ, मुलायम आणि चमकदार दिसेल. 

३. तांदळाच्या पिठाचा फेसमास्क :- हा मास्क त्वचेचा टोन सुधारण्यास आणि त्वेचेची जळजळ कमी करण्यास मदत करतो. २ मोठे चमचे तांदळाचे पीठ, १ मोठा चमचा दही, आणि १ मोठा चमचा कोरफड जेल घ्या. या सर्वांना एकत्र मिसळून एक मिश्रण तयार करा आणि चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्या. 

४. राईस वॉटर आईस क्यूब्स :- त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि त्वचा टवटवीत करणारा हा साधासोपा उपाय आहे. सर्वातआधी तांदूळ पाण्यात भिजवा आणि नंतर ते पाणी गाळून घ्या. हे पाणी आईस ट्रेमध्ये भरून ते पाणी फ्रिजमध्ये ठेवून गोठवून त्याचे आईस क्यूब तयार करून घ्या. तयार झालेले बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर हलक्या हातांनी चोळून लावा.

५. राईस स्क्रब :- राईस फ्लोअर स्क्रब त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करून त्वचेला नैसर्गिक चमक आणतो. २ मोठे चमचे तांदळाचे पीठ आणि १ मोठा चमचा मध घ्या. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळा आणि त्याने हलक्या हातांनी त्वचेची मालिश करा. यानंतर, चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Rice for radiant skin: 5 ways to Korean glass skin.

Web Summary : Rice offers antioxidants and vitamins for skin health. Achieve Korean glass skin using rice water mist, face packs, or scrubs. Simple, effective home remedies.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी