घरोघरी गणपतीचे आता उत्साहात आगमन झालेले आहे. आता इथून पुढे १० दिवस गणपतीच्या निमित्ताने घरी, मित्रमंडळींकडे, नातेवाईकांकडे किंवा मग कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतच असतात. अशा कार्यक्रमांना जाताना आपण छान तयार होतो. शिवाय लवकरच गौरीही येणार. त्यांचे पण हळदी- कुंकू आणि इतर कार्यक्रम असतातच. पण याच वेळी जर चेहऱ्यावर एखादा पिंपल दिसला तर मग मात्र सगळा मूड जातो (5 Tips to Avoid Pimples on Face). म्हणूनच अगदी सणासुदीच्या काळात चेहऱ्यावर पिंपल्स नको असतील तर या काही टिप्स पाहा..(how to get rid of pimples?)
सणासुदीच्या दिवसांत चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
१. सणासुदीच्या काळात खूप तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थांचा परिणाम त्वचेवर होतोच. त्यामुळे खाण्याकडे थोडं लक्ष द्या. तेलकट, तुपकट पदार्थ थोडे मर्यादित खा.
चहाचं पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा! न्हाऊन होताच केसांच्या समस्या कमी झालेल्या दिसतील..
२. पाणी भरपूर प्रमाणात प्या. यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीरातले विषारी पदार्थ शरीराबाहेर पडण्यास मदत होते. शरीर शुद्ध झाले की आपोआपच पिंपल्स येण्याचं प्रमाण कमी होतं.
३. आठवड्यातून दोन वेळा वाफ घ्या. वाफ घेतल्यामुळे त्वचेवरची बंद पडलेले पोअर्स ओपन होतात. त्यांच्यातली घाण निघून जाते आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
४. चेहऱ्यावर कोणताही नवा स्क्रब ट्राय करणार असाल तर ताे स्क्रब त्वचेवर जोरजोरात चोळू नका. हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा.
वजन, शुगर वाढेल म्हणून मोदक खावा की नाही असं वाटतंय? ऋजुता दिवेकर देतात खास टिप्स...
५. चेहऱ्यावर मेकअप ठेवून अजिबात झोपी जाऊ नका. मेकअप धुतल्यानंतर माॅईश्चरायजर किंवा मग साजुक तूप लावून हलक्या हाताने चेहऱ्याला मालिश करा. तसेच दिवसातून ३ ते ४ वेळा चेहरा धुवून स्वच्छ करा. बाहेरून आल्यानंतर आठवणीने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.