Lokmat Sakhi >Beauty > तळपाय कोरडे पडून खूपच भेगाळले? घरीच करा पेडिक्युअर- काळवंडलेले पाय दिसतील स्वच्छ, सुंदर

तळपाय कोरडे पडून खूपच भेगाळले? घरीच करा पेडिक्युअर- काळवंडलेले पाय दिसतील स्वच्छ, सुंदर

5 Steps Pedicure At Home: उन्हाळ्यात तळपाय कोरडे पडून त्यांच्यावर जास्तच भेगा आल्या असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी हा उपाय करून बघा..(home hacks for cracked heel)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 17:09 IST2025-05-08T17:08:37+5:302025-05-08T17:09:28+5:30

5 Steps Pedicure At Home: उन्हाळ्यात तळपाय कोरडे पडून त्यांच्यावर जास्तच भेगा आल्या असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी हा उपाय करून बघा..(home hacks for cracked heel)

5 steps pedicure at home, how to do pedicure at home, home hacks for cracked heel,  | तळपाय कोरडे पडून खूपच भेगाळले? घरीच करा पेडिक्युअर- काळवंडलेले पाय दिसतील स्वच्छ, सुंदर

तळपाय कोरडे पडून खूपच भेगाळले? घरीच करा पेडिक्युअर- काळवंडलेले पाय दिसतील स्वच्छ, सुंदर

Highlightsअगदी पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर केल्याप्रमाणे पाय स्वच्छ होतील. 

उन्हाळ्यात उष्णतेमुळे तळपायांना भेगा पडण्याचे प्रमाण खूप वाढते. अनेक जणींना उष्णतेचा हा त्रास होतोच. त्यामुळे पाय खूप घाण दिसतात. पायावरच्या भेगा वाढल्या तर त्यातून रक्तही येते. शिवाय भेगाळलेल्या तळपायांना सारखी खाजसुद्धा येते. भेगाळलेले पाय स्वच्छ करण्यासाठी पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नसेल किंवा पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा (5 steps pedicure at home). अगदी ५ साध्या सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही घरच्याघरी उत्कृष्ट पद्धतीने पेडिक्युअर करू शकता (how to do pedicure at home?). ते नेमके कसे करायचे ते पाहुया...(home hacks for cracked heel) 

 

घरच्याघरी पेडिक्युअर कसे करावे?

१. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे एका टबमध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये मीठ, शाम्पू, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला. या पाण्यात तुमचे पाय १० मिनिटे बुडवून ठेवा. 

गार्डनिंगची हौस, पण मोकळी जागाच नाही? ४ टिप्स- छोट्याशा बाल्कनीत लावता येतील भरपूर रोपं..

२. यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्या. एलोवेरा जेल लावून पायाला एखादा मिनिट मसाज करा. त्यानंतर रेझर घेऊन पायावर अलगदपणे घासा. यामुळे पायावरची आणि टाचांवरची डेड स्किन निघून जाईल आणि पाय स्वच्छ दिसतील. 

डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात 'या' पद्धतीने जेवा; शुगर वाढणार नाही- वजनही राहील नियंत्रणात

३. यानंतर एका वाटीमध्ये बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ एकत्र घ्या. या पिठामध्ये थोडे गुलाब पाणी टाकून ते व्यवस्थित कालवून घ्या. आता हा लेप तुमच्या पायांना लावा आणि तो सुकत आला की हाताचे चोळून लेप काढून टाका आणि पाय धुवून घ्या.

 

४. यानंतर कोणतेही इसेन्शियल ऑईल लावून तळपायांना मालिश करा. इसेंशियल ऑईल घरात नसल्यास नेहमीचे खोबरेल तेल किंवा बदाम तेल लावूनही पायांना मसाज करू शकता.

विकतसारखा बदामशेक घरीच करा, घ्या एकदम सोपी रेसिपी- उन्हाळ्यात प्यायलाच हवा हा गारेगार शेक

५. यानंतर काही वेळ सिलिकॉन सॉक्स पायात घालून ठेवा. यानंतर काही तासांसाठी बाहेर धुळीत, उन्हात जाणेही टाळावे. पाय अगदी पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर केल्याप्रमाणे स्वच्छ होतील. 


 

Web Title: 5 steps pedicure at home, how to do pedicure at home, home hacks for cracked heel, 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.