Join us

काळीकुट्ट दिसते पाठ ? ५ टिप्स, पाठ दिसेल स्वच्छ आणि खाज फोडही येणार नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 21:05 IST

5 Simple Tips For Smooth & Clean Back : 5 tips for flawless back : 5 Easy Beauty Tips For A Smooth And Clean Back : Beauty Rituals for a Clean Back : Beauty Hacks That Will Give You Clen Back With Flawless Skin : पाठीवर मळ साचून काळे पॅच दिसू लागलेत, तर करुन पहा काही खास घरगुती उपाय...

रोज आंघोळ करताना आपण संपूर्ण शरीर साबण व पाण्याने स्वच्छ करतो. शरीराची स्वच्छता राखताना आपण चेहरा, हात-पाय नीट धुतो, पण पाठ स्वच्छ करणे मात्र अनेकदा (5 Simple Tips For Smooth & Clean Back) अवघड जाते. पाठ स्वच्छ (5 tips for flawless back) करण्यासाठी आपले हात अगदी सहज पोहोचत नाही, फार कष्ट घ्यावे लागतात. यामुळेच पाठीवर घाम, डेड स्किन किंवा घाण साचून काळेकुट्ट डाग तयार होतात इतकेच नाही तर काहीवेळा स्किन प्रॉब्लेम्स (5 Easy Beauty Tips For A Smooth And Clean Back) देखील होऊ शकतात. पाठ नीट स्वच्छ न ठेवल्याने स्किन इरिटेशन आणि इन्फेक्शनही होऊ शकतं. असे होऊ नये म्हणून वेळीच लक्ष देऊन पाठ व्यवस्थित स्वच्छ करणे गरजेचे असते( Beauty Hacks That Will Give You Clen Back With Flawless Skin).

आपल्यापैकी बहुतेकजणी पाठीकडे फारसे लक्ष देत नाहीत, त्यांच्या शरीराच्या इतर भागांची चांगली काळजी घेतात, परंतु पाठीकडे दुर्लक्ष करतात. पाठीचे सौंदर्य कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाठीचा काळपटपणा आणि त्यावर वाढणारे नको असलेले काळे डाग आणि पुरळ ज्यामुळे पाठ आकर्षक व सुंदर दिसत नाही. यासाठीच, आपण काही सोप्या टिप्स आणि घरातील पदार्थांच्या मदतीने पाठीवरील काळेकुट्ट डाग सहजपणे काढू शकतो. पाठीवरील काळे डाग कमी करण्यासाठी आपण नेमकं काय करु शकतो ते पाहूयात. 

पाठीवरील काळेपणा दूर करण्यासाठी उपाय... 

१. ओटस व दही :- पाठ स्वच्छ करणे आपल्यासाठी नेहमीच अवघड असतं, त्यामुळेच पाठ काळी पडणे ही एक कॉमन समस्या आहे. यासाठीच, एका बाऊलमध्ये ३ टेबलस्पून ओट्सची बारीक पावडर घेऊन त्यात एक ते दोन टेबलस्पून दही घालून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट पाठीवर समानरित्या लावा आणि सुमारे २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने पाठ स्वच्छ धुवा. या उपायाने पाठीवरील काळेपणा हळूहळू कमी होऊन त्वचा उजळ आणि मऊ बनेल. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास उत्तम परिणाम मिळतील.  

मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर - असरदार घरगुती उपाय... 

२. संत्र्याची सालं व दूध :- काहीवेळा पाठीवर डेड स्किन साचल्यामुळे पाठ खूप घाणेरडी आणि निस्तेज दिसते. अशावेळी, संत्र्याच्या साली घरीच चांगल्या वाळवा आणि त्या बारीक करून पावडर तयार करा. ही पावडर थोड्या दुधात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट पाठीवर स्क्रबसारखी वापरा. हळूवारपणे मसाज करून ५ ते १० मिनिटे स्क्रब करा आणि नंतर कोमट पाण्याने पाठ धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास पाठीवरील डेड स्किन आणि ब्लॅकहेड्स कमी होऊन पाठ स्वच्छ, उजळ आणि मऊ दिसू लागेल.

कपभर बेसनाचा करा मस्त नैसर्गिक साबण, चेहऱ्यावर पिंपल्स असो की डाग; पाहा हा घरगुती उपाय...

३. एलोवेरा जेल व मुलतानी माती :- आपल्या संपूर्ण शरीराला रोज घाम येतो असाच, आपल्या पाठीला देखील घाम येतो. हा घाम रोज नीट स्वच्छ न करता आल्याने घामाचे थर पाठीवर साचून राहून पाठ तेलकट व चिकट होते. असा पाठीचा तेलकट व चिकटपणा घालवण्यासाठी एलोवेरा जेल व मुलतानी माती  फायदेशीर ठरते. एका बाऊलमध्ये मुलतानी माती आणि एलोवेरा जेल घेऊन ते एकजीव करून कालवून घ्यावे. त्यानंतर, तयार पेस्ट पाठीवर लावून हलक्या हाताने १० ते १५ मिनिटे मसाज करावा. मग कोमट पाण्याने पाठ स्वच्छ धुवून घ्यावी. या उपायामुळे पाठीवर घामाचा चिकट व तेलकट थर सहज निघतो आणि पाठ स्वच्छ व उजळ दिसू लागते. 

४. बेसन व हळद :- पाठीवरील काळपट डाग घालवण्यासाठी बेसन व हळद देखील तितकेच फायदेशीर आहे. दोन टेबलस्पून बेसनात अर्धा टेबलस्पून हळद आणि थोडं दूध घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पाठीवर लावून १५ ते २० मिनिटांनी हलक्या हाताने स्क्रब करत कोमट पाण्याने पा  धुवा. यामुळे डेड स्किन  निघून जाईल आणि पाठ उजळ होईल. 

स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाने करा मसाज! डार्क सर्कल्स गायब - डोळे दिसतील सुंदर,आकर्षक...

५. लिंबू व मध :- पाठीवरील काळपटपणा काढण्यासाठी लिंबू व मध उपयुक्त ठरते.  एक टेबलस्पून मधात अर्ध्या लिंबाचा रस पिळून पेस्ट तयार करा. ही तयार  पेस्ट पाठीवर लावून ५ ते ७ मिनिटे मसाज करा. लिंबातील सिट्रिक अ‍ॅसिड त्वचेतील मेलनिन कमी करतं आणि डेड स्किन काढून टाकतं, तर मध त्वचेला मॉइश्चराईझ करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय