नितळ, मऊ आणि सिल्की केस प्रत्येकाला हवेत. पण प्रदूषण, ताणतणाव, चुकीचा आहार आणि केमिकलयुक्त उत्पादने यामुळे केस कोरडे, राठ आणि निस्तेज होऊ लागतात. (5 home remedies for silky hair, must try - easy and effective )अशा वेळी महागड्या ट्रीटमेंट्सपेक्षा काही सोपे घरगुती उपाय नियमित केले तर केस नैसर्गिकरीत्या मऊ, चमकदार आणि सिल्की होऊ शकतात.
केस सिल्की ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना योग्य पोषण मिळणं. खोबरेल तेल, बदाम तेल किंवा तिळाचं तेल हलकं गरम करून नियमित डोक्याला मसाज केल्यास केसांच्या मुळांना बळ मिळतं आणि केस मऊ राहतात. तेल लावल्यामुळे स्काल्पमधील कोरडेपणा कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक येते. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी तेल लावणं फायदेशीर ठरतं.
घरगुती हेअर मास्क देखील केसांना सिल्की बनवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. दही आणि मध यांचं मिश्रण केसांना लावल्यास केसांना ओलावा मिळतो आणि ते अधिक मऊ होतात. केळं आणि दूध एकत्र करून लावल्यास केसांना नैसर्गिक कंडिशनिंग मिळतं. इतर नैसर्गिक वस्तूंचा वापरही केसांसाठी चांगला मानला जातो कारण त्यात प्रथिने असतात, ज्यामुळे केस मजबूत आणि मऊ होतात.
केस धुताना खूप गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करणं योग्य ठरतं. गरम पाण्यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि केस कोरडे पडतात. तसेच सौम्य शॅम्पू वापरणं आणि जास्त वेळा केस धुणं टाळणंही आवश्यक आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणं पुरेसं असतं. केस सिल्की ठेवण्यासाठी आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रथिने, व्हिटामिन्स आणि मिनरल्सने भरलेला आहार घेतल्यास केसांची गुणवत्ता सुधारते. पुरेसं पाणी पिणं देखील आवश्यक आहे, कारण शरीर हायड्रेटेड असेल तर केसही निरोगी राहतात.
केसांची योग्य काळजी घेताना काही गोष्टी टाळणंही तितकंच गरजेचं आहे. वारंवार हीट स्टायलिंग टूल्स जसं की स्ट्रेटनर, कर्लर किंवा ब्लो ड्रायर वापरणं टाळावं, कारण यामुळे केस कोरडे आणि कमजोर होतात. केमिकलयुक्त शाम्पू आणि हेअर प्रॉडक्ट्सचा अति वापरही केसांची नैसर्गिक चमक कमी करतो. ओले केस जोरात विंचरणं किंवा रफ टॉवेलने पुसणं टाळावं, कारण त्यामुळे केस तुटू शकतात. याशिवाय, केस खूप घट्ट बांधणं, सतत वेगवेगळे हेअर स्टाइल्स करणं किंवा झोपताना केसांची योग्य काळजी न घेणं यामुळेही केसांची गुणवत्ता कमी होते. शक्य असल्यास सॅटिन किंवा सिल्कच्या उशीच्या कव्हरचा वापर केल्यास केसांचं घर्षण कमी होतं आणि केस अधिक मऊ राहतात.
Web Summary : Achieve soft, silky hair naturally with simple home remedies. Regular oil massages, homemade hair masks (like yogurt and honey), and gentle hair washing techniques can improve hair health. Avoid heat styling and harsh products for best results.
Web Summary : आसान घरेलू उपायों से स्वाभाविक रूप से मुलायम, रेशमी बाल पाएं। नियमित तेल मालिश, दही और शहद जैसे घरेलू हेयर मास्क, और कोमल बाल धोने की तकनीक से बालों के स्वास्थ्य में सुधार हो सकता है। सर्वोत्तम परिणामों के लिए हीट स्टाइलिंग और कठोर उत्पादों से बचें।