Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केसगळती वाढवणारे 5 अन्नपदार्थ, आपणही रोज खात असाल तर वेळीच व्हा सावध!

केसगळती वाढवणारे 5 अन्नपदार्थ, आपणही रोज खात असाल तर वेळीच व्हा सावध!

Hairfall Causes Foods : केसगळतीची खरी कारणं आपल्या स्वयंपाकघरात लपलेली असू शकतात. आज आपण अशाच ५ अन्नपर्थांबाबत पाहणार आहोत, जे केसगळतीचे कारण ठरू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:50 IST2025-10-13T13:50:07+5:302025-10-13T13:50:42+5:30

Hairfall Causes Foods : केसगळतीची खरी कारणं आपल्या स्वयंपाकघरात लपलेली असू शकतात. आज आपण अशाच ५ अन्नपर्थांबाबत पाहणार आहोत, जे केसगळतीचे कारण ठरू शकतात.

5 foods that can increase hair fall you must know | केसगळती वाढवणारे 5 अन्नपदार्थ, आपणही रोज खात असाल तर वेळीच व्हा सावध!

केसगळती वाढवणारे 5 अन्नपदार्थ, आपणही रोज खात असाल तर वेळीच व्हा सावध!

Hairfall Causes Foods : केसगळतीची समस्या आजकाल इतकी वाढले आहे की, जगभरातील लोक यामुळे चिंतेत आहेत. कारण तरूण वयातच केस गळतात आणि स्मार्ट दिसण्याऐवजी टक्कल दिसू लागतं. महिलांचे केस पातळ होतात. आता केसगळतीची कारणं समजण्यासाठी सगळेच काही हेल्थ किंवा ब्यूटी एक्सपर्ट असतात असं नाही. त्यामुळे कुणाचं तरी ऐकून वेगवेगळे उपाय केले जातात. पण हे उपाय फायदेशीर असतातच असं नाही. मुळात केसगळतीवर उपाय करण्याआधी याची कारणं आपल्याला माहीत असली पाहिजेत. केसगळतीची खरी कारणं आपल्या स्वयंपाकघरात लपलेली असू शकतात. आज आपण अशाच ५ अन्नपर्थांबाबत पाहणार आहोत, जे केसगळतीचे कारण ठरू शकतात.

साखरेचे पदार्थ

गोड पदार्थ फक्त वजन वाढवतात असे नाही, तर हे तुमचे केस देखील कमजोर करू शकतात. जास्त साखर खाल्ल्यामुळे शरीरात इन्सुलिन वाढतो, ज्यामुळे अँड्रोजन नावाचा हार्मोन वाढतो. हा हार्मोन केसांच्या रोमछिद्रांना कमजोर करू शकतो आणि केस गळण्याची समस्या वाढवू शकतो.

पॅकेज्ड आणि जंक फूड्स

चिप्स, पिझ्झा, बर्गर यांसारख्या जंक फूड्समध्ये अनेकदा ट्रान्स फॅट आणि सेच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असतात. हे फॅट शरीरात सूज निर्माण करतात, ज्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत आवश्यक पोषण पोहोचत नाही आणि ते कमकुवत होऊन तुटू लागतात.

जास्त मीठ असलेले जेवण

जर तुम्हाला चटपटीत आणि जास्त खारट जेवण आवडत असेल, तर थोडे सावध व्हा. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. यामुळे केस लवकर तुटू लागतात.

मद्यपान

दारू शरीराला निर्जलीत करते म्हणजेच शरीरातील पाणी कमी होतं. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, त्याचा परिणाम केसांवरही होतो. केस कोरडे आणि कमकुवत होतात, ज्यामुळे ते सहज गळू लागतात.

डेअरी प्रॉडक्ट

काही दुग्धजन्य पदार्थ, खासकरून ज्यात जास्त फॅट असतो, शरीरात सेबमचे उत्पादन वाढवू शकतात. सेबम हा तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात असल्यास केसांच्या पोर्स बंद करू शकतो, ज्यामुळे केसांची वाढ थांबते आणि केस गळू लागतात. जर तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल, तर लो फॅट दुग्धजन्य पदार्थांचा वापर करणे चांगले ठरेल.

Web Title : सावधान! ये 5 खाद्य पदार्थ बढ़ा सकते हैं आपका हेयर फॉल।

Web Summary : चीनी, जंक फूड, अधिक नमक, शराब और उच्च वसा वाले डेयरी उत्पाद बालों के झड़ने को बढ़ा सकते हैं। ये चीजें सूजन, डिहाइड्रेशन और सीबम निर्माण का कारण बनती हैं, जिससे बालों के रोम कमजोर हो जाते हैं। स्वस्थ बालों के लिए सेवन सीमित करें।

Web Title : Beware! These 5 foods can worsen your hair fall.

Web Summary : Sugar, junk food, excess salt, alcohol, and high-fat dairy can trigger hair fall. These items cause inflammation, dehydration, and sebum buildup, weakening hair follicles. Limit intake for healthier hair.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.