Lokmat Sakhi >Beauty > जास्वंदीचे लालबुंद फुल करते त्वचेवर जादू! त्वचेच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी सुंदर औषध...

जास्वंदीचे लालबुंद फुल करते त्वचेवर जादू! त्वचेच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी सुंदर औषध...

5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Dark Spots & Will Remove The Problem Of Skin : 5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Skin Problems : 5 Best Hibiscus Flower Face Masks For Skin : जास्वंदाची पानं फुलं स्किनकेअरसाठी अत्यंत आवश्यक आणि असरदार उपाय आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 14:00 IST2025-06-21T13:42:34+5:302025-06-21T14:00:38+5:30

5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Dark Spots & Will Remove The Problem Of Skin : 5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Skin Problems : 5 Best Hibiscus Flower Face Masks For Skin : जास्वंदाची पानं फुलं स्किनकेअरसाठी अत्यंत आवश्यक आणि असरदार उपाय आहे.

5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Dark Spots & Will Remove The Problem Of Skin 5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Skin Problems | जास्वंदीचे लालबुंद फुल करते त्वचेवर जादू! त्वचेच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी सुंदर औषध...

जास्वंदीचे लालबुंद फुल करते त्वचेवर जादू! त्वचेच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी सुंदर औषध...

आपल्या सगळ्यांच्याच बाल्कनीत, गार्डनमध्ये जास्वंदीच्या फुलांचे एखादे रोप असतेच. आपण जास्वंदीचे फुल नेहमीच देवाला अर्पण करतो, परंतु याशिवाय जास्वंदीच्या फुलांचा वापर त्वचेसाठी देखील केला जातो. जास्वंदीच्या फुलांचा वापर प्राचीन काळापासून त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य राखून ठेवण्यासाठी केला जातो. जास्वंदीच्या ( 5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Skin Problems) इवल्याशा लालचुटुक (5 Best Hibiscus Flower Face Masks For Skin) फुलांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि ॲमिनो अ‍ॅसिड्स असतात जे त्वचेला पोषण देतात, कोरडेपणा दूर करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात. जर आपल्या घरातच जास्वंदीच्या फुलांचे रोप असेल तर त्वचेसाठी इतर उपाय करण्याची गरजच भासणार नाही(5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Dark Spots & Will Remove The Problem Of Skin).

त्वचेचे आरोग्य व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेकजणी घरगुती व नैसर्गिक उपाय करणेच पसंत करतात. या घरगुती उपयांमध्ये जास्वंदीच्या फुलांचे वेगवेगळे फेसमास्क हा एक उत्तम पर्याय ठरतो. आपल्या त्वचेवरील मुरुमांच्या समस्या, कोरडेपणा, सुरकुत्या किंवा चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी जास्वंदीचा फेसमास्क फायदेशीर ठरतो. जास्वंदीच्या फुलांचे वेगवेगळ्या पद्धतीचे घरगुती फेसमास्क तयार करण्याची सोपी पद्धत, त्याचे सौंदर्यवर्धक गुणधर्म आणि नियमित वापरल्यास मिळणारे फायदे याविषयी अधिक माहिती पाहूयात. 

जास्वंदीच्या फुलांचे फेसमास्क... 

१. जास्वंदीच फुल व दही :- जास्वंदीची २ ते ३ फुलं घेऊन ती बारीक वाटून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये एक चमचा दही घालून चांगलं मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटे सुकू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. दह्यामध्ये असलेलं लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचेचं सौम्य एक्सफोलिएशन करतं, तर जास्वंदीच फुलं त्वचेचा रंग उजळ करतात आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यात मदत करतात.

स्वयंपाकघरातच आहेत पिगमेंटेशन कमी करणारे ३ पदार्थ, त्वचा होते उजळ-स्पॉटलेस- वाचा एक्सपर्ट सल्ला...

२. जास्वंदीच फुल व मध :- जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या घेऊन त्या बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. जास्वंदीच्या पाकळ्यांच्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळा. हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. मध त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्चराईझ करतो, त्यामुळे हा फेसपॅक कोरड्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

३. जास्वंदीच फुल व मुलतानी माती :- २ जास्वंदीची फुलं वाटून त्याची पेस्ट तयार करा. त्यात एक चमचा मुलतानी माती आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी  मिसळा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे सुकू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करतो, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते. जास्वंदीच्या फुलांमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात.

अळशीचा साबण करा घरच्याघरी, विकतच्या साबणांपेक्षा सुंदर आणि त्वचा होते मऊमऊ फ्रेश...

४. जास्वंदीच फुल व लिंबाचा रस :- जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या बारीक वाटून त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. हा फेसपॅक त्वचेवर लावून १० ते १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. लिंबूमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते, जे पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करते. या फेसपॅकच्या वापरामुळे त्वचा उजळ आणि तजेलदार दिसते. 

५. जास्वंदीच फुल व एलोवेरा जेल :- जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या बारीक वाटून त्यामध्ये एक चमचा एलोवेरा जेल मिसळा.हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून २० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. एलोवेरा जेल त्वचेची सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतो, त्यामुळे हा पॅक सनटॅन दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Web Title: 5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Dark Spots & Will Remove The Problem Of Skin 5 Face Packs Made From Hibiscus Flowers Will Reduce Skin Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.