Join us

थंडीत त्वचेला मायेनं लावा या ५ पैकी १ गोष्ट रोज, कोरडी त्वचा-पायाला भेगा- सगळ्यांवर उत्तम उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2024 08:35 IST

Home remedies for dry skin : 5 Natural Dry-Skin Remedies : Say Goodbye To Dry Skin With These 5 Home Remedies : 5 Effective Home Remedies for Dry Skin Problems : हिवाळ्यात महागडे क्रिम, मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपाय नक्की करुन पाहा...

सध्या वातावरणात बराच गारवा आहे. थंडीत आरोग्यासोबतच आपल्याला त्वचेचीदेखील काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू लागते. कधी कधी त्वचा इतकी कोरडी पडते की त्वचेला खाज सुटते आणि त्वचेतून पांढरा कोंडा निघतो. अशावेळी आपण त्वचा कोरडी पडू नये म्हणून त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम्स, लोशन, मॉइश्चरायझर लावणे असे उपाय करतो. पण या उपायांचाही म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. यासाठी आपण हिवाळ्यात काही घरगुती ( Say Goodbye To Dry Skin With These 5 Home Remedies) आणि नैसर्गिक उपाय नक्की करून पाहू शकतो. त्याने फुटलेली किंवा भेगा पडलेली त्वचा पुन्हा मऊ मुलायम होण्यास अधिक मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी या ५ पैकी १ गोष्ट तरी रोज लावा, पाहा बदल(5 Effective Home Remedies for Dry Skin Problems).

१. ग्रीन टी टोनर :- शक्यतो चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर टोनर लावले जाते. टोनरच्या वापराने त्वचेचे ओपन पोर्स कमी होऊन त्वचेतील घाण अशुद्धीही स्वच्छ केली जाते. बाजारातून महागडे टोनर विकत घेण्याऐवजी आपण ग्रीन टी टोनर घरीच तयार करु शकता. ग्रीन टी टोनर बनवण्यासाठी ग्रीन टी उकळवा. त्यानंतर ही ग्रीन टी थंड झाल्यावर गाळून स्प्रे बाटलीत भरून ठेवा. अशाप्रकारे आपण हिवाळ्यात ग्रीन टी टोनरचा वापर करु शकतो. 

२. खोबरेल तेल :- हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर खोबरेल तेल लावले जाते. कोरड्या त्वचेसाठी हा सर्वात जुना आणि असरदार उपाय आहे. खोबरेल तेलात गुड फॅट्स असतात जे आपल्या त्वचेवर एक संरक्षणात्मक लेअर तयार करतात. यामुळे हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडत नाही. यासाठी खोबरेल तेलाचे ४ ते ५ थेंब त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करुन घ्यावा. 

घ्या फक्त चमचाभर साजूक तूप, पायाच्या भेगा - फुटलेले ओठ- कोरडी त्वचा होईल पुन्हा मऊ, मुलायम...

३. बदामाचे तेल :- बदामाच्या तेलाचा उपयोग सौंदर्यासाठी करायचा, हे बहुतांश जणांना माहिती आहे. हिवाळ्यात त्वचेचा काेरडेपणा घालविण्यासाठी, त्वचा चमकदार बनविण्यासाठी बदामाचं तेल अतिशय उपयुक्त ठरतं. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई, फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, झिंक इत्यादी आवश्यक घटक असतात. जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. बदामाचं तेल सहजपणे त्वचेमध्ये सामावतं.

 हिवाळ्यात वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, त्वचा कोरडी रखरखीत होण्याचा धोका टाळा...

४. एलोवेरा जेल :- हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा आधीच कोरडी होते. कारण वातावरणातील थंड हवेमुळे त्वचेतील आर्द्रता शोषून घेतली जाते. अशा परिस्थितीत, त्वचेला ओलावा मिळवून देण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करावा. आपण त्वचेला एलोवेरा जेल लावून मॉइश्चरायझिंग करू शकता. एलोवेरा जेलमुळे हिवाळ्यात त्वचा ताणली जाणार नाही, तसेच त्वचेचा ओलावा कायम टिकून राहील. 

५. ऑलिव्ह ऑईल :- हिवाळ्यात त्वचेसाठी फायदेशीर तेलांमध्ये ऑलिव्ह ऑईलचाही समावेश होतो. ऑलिव्ह ऑईलचे ४ ते ५ थेंब घेऊन त्वचेला मसाज करावा  . हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरणे देखील एक चांगला पर्याय असू शकतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग घटक असतात. हिवाळ्यात आंघोळ केल्यानंतर ऑलिव्ह ऑईलने मसाज करून त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवता येते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी