आजकाल कमी वयात केस पांढरे होणं (Hair Care Tips) खूपच कॉमन झालं आहे. २५ ते ३० वयोगटातील लोकांचे केस पांढरे होतात. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, ताण-तणाव, झोपेची कमतरता, शरीरातील पोषक घटकांची कमतरता यामुळे केसांच्या समस्या उद्भवतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. प्रसिद्ध योग गुरू हंसाजी योगेंद्र यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर काही घरगुती उपाय शेअर केले आहेत. ज्यामुळे तुम्ही केसांना सुंदर लूक देऊ शकता. वेळेआधीच केस पांढरे होऊ नयेत यासाठी ५ उपाय पाहूया. (5 Best Home Remedies For White Hair Know How To Reverse Greying Of Hair Naturally)
जास्वंद आणि दह्याचा पॅक
डॉक्टर हंसाजी सांगतात की जास्वंद केसांसाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे स्काल्पला पोषण मिळते आणि केसांची मुळं मजबूत राहतात. यासाठी एका भांड्यात ४ चमचे दही आणि अर्धा कप जास्वंदाची पावडर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्काल्प आणि केसांना लावा. नंतर ३० ते ४० मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्यानं धुवून घ्या. हा पॅक केसांना नैसर्गिक रंग देईल.
भृंगराज आणि आवळ्याचं तेल
भृंगराज आणि आवळा दोन्ही केसांना काळे आणि दाट बनवण्यास मदत करतात. झोपण्याआधी दोन्ही तेल योग्य प्रमाणात व्यवस्थित मिसळून हलक्या हातानं स्काल्पवर मालिश करा, रात्रभर असंच सोडा. सकाळी केस धुवा. हे तेल फक्त केसांची वाढ करत नाही तर पांढरे केस काळे होण्यास मदत होते.
अश्वगंधा चहा
अश्वगंधा एक शक्तीशाली जडीबुडी असून शरीरात मेलानिन तयार करण्यास मदत करते. हे तत्व केसांना नैसर्गिक काळा रंग देतात. एक कप पाण्यात १ चमचा अश्वगंधा पावडर घालून १० ते १५ मिनिटं उकळवून घ्या. त्यात थोडं मध आणि लिंबू घालून मिसळा. योग गुरू सांगतात की असा चहा ताण-तणाव कमी करण्यास मदत करतो आणि केसांचे आरोग्य चांगले ठेवतो.
दिवाळीसाठी ब्लाऊज शिवून घेताय? १० नवीन स्लिव्हज पॅटर्न्स पाहा, स्टायलिश-सुंदर लूक येईल
योगासन आणि प्राणायम
हंसाजी पुढे सांगतात की, योगा केल्यानं रक्ताभिसरण वाढतं. ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. पांढरे केस कमी होतात. सर्वांगासन, हस्तपादासन आणि अधोमुख स्वानासन यांसारखी आसनं रोज केल्यानं स्काल्पला ऑक्सिजन आणि पोषण मिळते ज्यामुळे केस गळणं आणि केस पांढरे होणं दोन्ही थांबते.
मोठा दागिना परवडत नाही, बायकोसाठी पाडव्याला घ्या १ ग्रॅम सोन्यात नाजूक अंगठी; १० डिझाइन्स
ओमेगा ३ युक्त आहार
तुमचा आहार खाण्यापिण्यावर थेट परीणाम करतो. योग गुरू डाएटमध्ये काजू, बदाम, मशरूम, दही, पनीर, अक्रोड, अळशीच्या बिया, पालक, ब्रोकोली खाण्याचा सल्ला देतात. यात कॉपर, व्हिटामीन बी, ओमेगा-३ फॅटी एसिड असते ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळेभोर होतात.