Join us

खा तूप मिळेल रुप! चेहऱ्यासह ओठ आणि हातपायांना तूप लावण्याचे ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2023 17:30 IST

5 Benefits And Ways Of Applying Ghee For Face तूप खाऊन तर रुप मिळतेच पण तूप लावल्यानंही सौंदर्य लाभते, लावून तर पाहा

खाल तूप तर येईल रूप ही म्हण तर आपण ऐकलीच असेल. साजूक तूप म्हणजे सौंदर्याचा खजिना. तुपाचा वापर अनेक पदार्थात केला जातो. मुख्य म्हणजे लोकं भात - वरणासोबत तूप आवडीने खातात. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी, कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात.

तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तूप फक्त आरोग्यासाठी नाही तर, स्किनसाठी देखील फायदेशीर ठरते. तुपातील पौष्टीक घटक स्किनला पोषण देतात. स्किन केअर रुटीनमध्ये तुपाचा समावेश केल्याने चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात(5 Benefits And Ways Of Applying Ghee For Face).

हायड्रेटेड स्किन

तुपामध्ये व्हिटॅमिन ए आणि फॅटी ऍसिड आढळते. तूप नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे काम करते. यामुळे त्वचा दीर्घकाळ हायड्रेट राहते. कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी तूप खूप फायदेशीर ठरते. आंघोळ करण्यापूर्वी आपण स्किनवर तुपाचा वापर करून मसाज करू शकता. तुपामुळे आपली त्वचा मुलायम राहते.

मेहंदी लावा, डाय करा, कलर करा -केस पांढरेच? घ्या, खास आयुर्वेदिक उपाय-केस होतील काळे

फाटलेले ओठ

फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी आपण तुपाचा वापर करू शकता. हे फाटलेले ओठ बरे करण्याचे काम करतात. तुपामुळे ओठ मऊ होतात.

टॉक्सिन बाहेर काढते

तुपात जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड असतात. जे पचनसंस्थेसाठी उत्तम मानले जाते. तूप खाल्ल्याने टॉक्सिन बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार दिसते.

३ गोष्टी खाणं पिणं बंद करा, केस गळतीचा प्रश्न कायमचा सुटेल- केस होतील दाट काळेभोर

डार्क सर्कल

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याची शोभा कमी होते. आपण डार्क सर्कलवर तूप लावू शकता. ज्यामुळे काळे वर्तुळे कमी होतील, व त्वचा तजेलदार दिसेल. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली तूप लावून मसाज करा, याने फरक दिसेल.

तरुण त्वचा

तुपात अ, ड आणि ई जीवनसत्त्वे असतात. यासह अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी  होतात. ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी