उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग, काळपटपणा आणि निस्तेजपणा येणे ही खूप सामान्य समस्या आहे. अशावेळी केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सऐवजी घरगुती उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. अनेकविध घरगुती उपाय आहेत. (4 ways to apply turmeric to skin- Darkened skin will look beautiful - Golden and radiant)जे आपण करु शकतो. त्यापैकी एक प्रभावी पर्याय म्हणजे हळद. हळद हा असा एक नैसर्गिक घटक आहे, ज्यात अँटी ऑक्सिडंट, अँटीसेप्टिक आणि त्वचा उजळवणारे गुणधर्म असतात. योग्य पद्धतीने वापरल्यास हळद त्वचेवरील टॅन कमी करून नैसर्गिक चमक परत आणू शकते.
मात्र पी हळद आणि हो गोरी असे होत नाही. हळद वापरण्याच्या काही योग्य पद्धती आहेत. उन्हाळ्यात डिटॅनिंगसाठी हळदीचा वापर करण्याच्या काही सोप्या आणि प्रभावी पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.पहिली पद्धत म्हणजे हळद आणि दही यांचा वापर. दहीमध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि टॅन कमी करते. एका वाटीत एक चमचा दही घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. पंधरा ते वीस मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. यामुळे त्वचा मऊ आणि उजळ दिसते.
दुसरी पद्धत म्हणजे हळद आणि लिंबू. लिंबामध्ये व्हिटामिन सी असल्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. एक चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद एकत्र करून टॅन झालेल्या भागावर लावा. मात्र, संवेदनशील त्वचा असल्यास हा उपाय काळजीपूर्वक करावा. तज्ज्ञांच्या सल्ला घ्या मगच उपाय करा.
तिसरी पद्धत म्हणजे हळद आणि बेसन. बेसन त्वचेतील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकतो. दोन चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि थोडे दूध किंवा गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेला लावून सुकल्यावर हलक्या हाताने धुवा. हा उपाय टॅन कमी करण्याबरोबरच त्वचा स्वच्छ आणि तजेलदार बनवतो.
चौथी पद्धत म्हणजे हळद आणि कोरफड (अलोव्हेरा). कोरफड त्वचेला थंडावा देऊन सूज आणि लालसरपणा कमी करते. ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये चिमूटभर हळद मिसळून त्वचेवर लावा. हा उपाय उन्हामुळे झालेल्या त्वचेच्या त्रासावर विशेष प्रभावी ठरतो. या सर्व पद्धती नियमितपणे वापरल्यास उन्हाळ्यातील टॅनिंग हळूहळू कमी होऊ शकते आणि त्वचा पुन्हा निरोगी दिसू लागते. मात्र, हळदीचा वापर करताना प्रमाण योग्य ठेवणे आणि वापरानंतर त्वचा स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक उपायांचा सातत्याने आणि संयमाने वापर केल्यास त्वचेवर नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतात.
Web Summary : Combat summer tanning with turmeric! Use it with yogurt, lemon, gram flour, or aloe vera for radiant, healthy skin. Regular use yields positive results.
Web Summary : हल्दी से गर्मियों में टैनिंग से मुकाबला! दही, नींबू, बेसन या एलोवेरा के साथ इसका उपयोग करें चमकदार, स्वस्थ त्वचा के लिए। नियमित उपयोग से सकारात्मक परिणाम मिलते हैं।