उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून तिला जपावं लागतं तर उन्हाळ्यात त्याच्या अगदी उलट करावं लागतं. कारण उन्हाळ्यात सारखा घाम येऊन त्वचा खूपच घामट, तेलकट, चिपचिपित होऊन जाते (how to get rid of oily skin in summer?). अशी त्वचा खूप लवकर टॅन होऊन काळी पडते. त्यामुळेच उन्हाळ्यात त्वचेमधून स्त्रवणाऱ्या सेबमचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल (4 tips to control oil and extra sebum production from skin) तर त्यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय तुम्ही घरच्याघरी करून पाहू शकता..(best home made face pack in summer for oily skin)
उन्हाळ्यात त्वचा तेलकट, चिपचिपित होऊ नये म्हणून उपाय
१. मुलतानी मातीचा फेसपॅक या दिवसांत चेहऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. यासाठी एका वाटीमध्ये मुलतानी माती घ्या आणि त्यामध्ये गुलाबजल घालून तिचा लेप करा. हा लेप चेहऱ्याला लावा. मुलतानी मातीमुळे त्वचेमधलं अतिरिक्त तेल शोषलं जाईल तसेच गुलाब पाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळेल.
हिरव्याकंच कैरीचा करा आंबट- गोड चटपटीत मेथांबा! चवीत बदल होऊन जेवणात येईल रंगत
२. बेसन आणि दही हा उपायही तुम्ही करून पाहू शकता. हा उपाय करण्यासाठी बेसन पीठामध्ये दही आणि चिमूटभर हळद तसेच ५ ते ६ थेंब लिंबाचा रस घालून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्याला १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. यामुळेही त्वचेचा तेलकटपणा कमी होताे.
३. कडुलिंबाची पावडर आणि संत्रीच्या सालांची पावडर एकत्र करा आणि कच्चं दूध तसेच मध घालून ती व्यवस्थित कालवून घ्या. यानंतर हा लेप १० ते १५ मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून ठेवा. यामुळेही त्वचा कोरडी राहण्यास मदत होते.
फेशियल करायला वेळ नसतो तेव्हा माधुरी दीक्षित काय करते? बघा तिनेच सांगितलेला सोपा उपाय
४. चंदनाच्या पावडरमध्ये कोरफडीच्या पानांचा थोडा गर घालून त्याची व्यवस्थित पेस्ट करून घ्या. हा पॅक चेहऱ्याला लावल्यानेही त्वचा फ्रेश- तजेलदार राहण्यास मदत होते.