Join us

फक्त ३ घरगुती उपाय, कुठलेही महागडे कॉस्मेटिक न वापरता कायमसाठी येईल चेहऱ्यावर चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 18:23 IST

4 Natural Remedies For Young Glowing Skin: त्वचेवरची चमक नेहमीसाठी टिकवून ठेवायची असेल तर हे काही उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरू शकतील..(home hacks to reduce pimples and acne)

ठळक मुद्देत्वचेला जर खरोखरच चमकदार करायचं असेल, तिचं सौंदर्य खुलवायचं असेल तर सगळे वरवरचे उपाय थांबवा आणि हे काही खास उपाय करून पाहा.

त्वचेची पुरेशी काळजी घेणं झालं नाही की मग त्वचेवरचा ग्लो हळूहळू कमी होत जातो. यासाठी वरवरचे फेसवॉश किंवा फेसक्रीम लावणे हा उपाय होऊ शकत नाही. कारण तुम्ही असे वरवरचे उपाय जर केले तर निश्चितच तुमचा चेहरा खुलेल, त्वचा छान तुकतुकीत दिसू लागेल. पण त्वचेमध्ये होणारा हा बदल खूप काळ टिकणारा नसतो. अगदी एक- दोन दिवसांतच त्वचा पुन्हा तिच्या मुळ पदावर येते (home hacks to reduce pimples and acne). अगदी फेशियल केल्यानंतरही बऱ्याचदा आपण हा अनुभव घेतोच (how to get radiant glowing skin?). यासाठीच त्वचेला जर खरोखरच चमकदार करायचं असेल, तिचं सौंदर्य खुलवायचं असेल तर सगळे वरवरचे उपाय थांबवा आणि हे काही खास उपाय करून पाहा.(4 natural remedies for young glowing skin)

त्वचेचं सौंदर्य नेहमीसाठी टिकून राहावं म्हणून उपाय

 

त्वचेवरची चमक नैसर्गिक पद्धतीने टिकवून ठेवायची असेल तर नेमके काय उपाय करावे याची माहिती योगतज्ज्ञांनी humyog या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यांनी सांगितलेले उपाय पुढीलप्रमाणे..

यंदा लोणचं घालण्यासाठी घरीच करा अस्सल मराठवाडी लोणचं मसाला- लोणचं होईल एकदम झकास...

१. कडुलिंब आपल्या त्वचेसाठी अतिशय  गुणकारी ठरतं. कडुलिंब हे नॅचरल डिटॉक्स म्हणून ओळखलं जातं. ज्यांच्या त्वचेवर नेहमीच पिंपल्स आणि ॲक्ने असतात, त्यांच्यासाठी तर कडुलिंब अतिशय उपयुक्त ठरतं. 

पावसाळ्यात साप निघण्याचं प्रमाण वाढतं! खबरदारी म्हणून ५ गोष्टी करा, सापांपासून बचाव होईल

२. दुसरं म्हणजे चंदन. चंदन पावडर किंवा चंदनाचा लेप त्वचेला छान मुलायम, चमकदार बनवतो. म्हणूनच कडुलिंबाची पावडर आणि चंदन हे दोन्ही एकत्र करून त्यांचा फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावा. यामुळे पिंपल्स, ॲक्ने कमी होऊन त्वचेचं सौंदर्य खुलेल.

 

३. हळदीचा काढा नियमितपणे घ्यावा. यामुळे त्वचेवर येणारी सूज कमी होते. त्वचेवरची सूज वाढली की चेहरा कमी वयातच वयस्कर दिसू लागतो. यासाठी हळद उपयुक्त ठरते. तसेच हळदीमुळे स्किन कॉम्प्लेक्शन एकसारखे होण्यासही मदत होते.

पावसाळ्यात सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असणाऱ्या ४ साड्या! तुमच्याकडे नसल्यास लगेच खरेदी करून टाका

४. कडिपत्ता देखील त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणात कडिपत्ता असायलाच हवा. कडिपत्त्यामुळे शरीराची आतून शुद्धी होऊन त्वचेचं सौंदर्य खुलून येते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी