Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? ४ पदार्थ खायला लगेच सुरु करा, कायम चिरतरुण राहाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2025 16:12 IST

4 Foods For Young And Beautiful Skin: त्वचा कायम तरुण, टवटवीत, तजेलदार ठेवायची असेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असायलाच हवे.(how to keep skin young and beautiful always?)

ठळक मुद्देवय वाढलं तरी त्वचा मात्र तरुणच ठेवायची असेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ नियमितपणे तुमच्या आहारात असायला हवे.

त्वचेची पुरेपूर काळजी घ्यायला वेळ मिळत नसेल किंवा मग आहारातून त्वचेला पुरेसं पोषण मिळत नसेल तर लगेचच त्वचेचा ग्लो कमी व्हायला सुरुवात होते. कपाळावर, डोळ्यांच्या खाली हलक्याशा सुरकुत्याही दिसायला लागतात. कारण एकतर आपल्या त्वचेला सतत ऊन, प्रदुषण यांचा सामना करावा लागतो. त्वचेला आपण केमिकल्स असणारे वेगवेगळे कॉस्मेटिक्सही लावतो. त्याचा हळूहळू त्वचेवर परिणाम होतोच... त्यामुळे मग काही जणींना अगदी तिशीच्या मागेपुढेच त्वचेवर बारीक सुरकुत्या दिसायला लागतात (4 Foods For Young And Beautiful Skin). असं होऊ द्यायचं नसेल आणि वय वाढलं तरी त्वचा मात्र तरुणच ठेवायची असेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ नियमितपणे तुमच्या आहारात असायला हवे..(how to keep skin young and beautiful always?)

त्वचेचं सौंदर्य आणि तारुण्य टिकवून ठेवणारे पदार्थ 

 

१. रताळी

आपल्याकडे आपण रताळे फक्त उपवासाच्या दिवशीच खातो. पण खरंतर रताळे एवढे पौष्टिक आहेत की ते नियमितपणे आपल्या आहारात असायला हवे. उकडलेल्या रताळ्यांचा गर काढून चेहऱ्यालाही लावू शकता. १० ते १२ मिनिटांनी चेहरा धुवून टाकायचा. त्वचा अतिशय मऊ होते.

लग्नसराईत जावई, मुलासाठी कमी वजनात घ्या सुंदर ब्रेसलेट! ठसठशीत ब्रेसलेटमध्ये हात दिसेल भारदस्त

२. आवळा 

थंडीच्या दिवसांत मिळणाऱ्या आवळ्यांचा पुरेपूर उपयोग आपल्या त्वचेसाठी करून घेता येतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तब्येत तर ठणठणीत ठेवतातच. पण त्वचा आणि केस या दोन्हींसाठीही खूप गुणकारी असतात. त्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या पदार्थाच्या माध्यमातून आवळा नक्कीच खा.

 

३. भोपळ्याच्या बिया

रोज एक चमचा भोपळ्याच्या बिया खायला हव्या. कारण त्वचेला ताकद देण्याचं काम भोपळ्याच्या बिया करतात. त्वचेचं आरोग्य उत्तम असेल तर आपोआपच त्वचेच्या सगळ्या तक्रारी दूर होतात आणि चेहऱ्यावर तेज दिसू लागतं.

अभिनेत्री भाग्यश्री सांगते हिवाळ्यात मटार खाण्याचे ४ फायदे आणि मटारच्या भाजीची ५ मिनिटांत होणारी रेसिपी

४. साजुक तूप

साजुक तूप त्वचेसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी जणू वरदान आहे. घरी तयार केलेलं साजुक तूप रोज १ चमचा खा आणि दररोज रात्री झोपण्यापुर्वी ते चेहऱ्यालाही लावा. यामुळे त्वचेची लवचिकता वाढते, त्वचा कोमल राहाते आणि त्वचेवरचं तेजही वाढतं. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Get rid of wrinkles with these 4 foods for youthful skin.

Web Summary : To maintain youthful skin, include sweet potatoes, amla, pumpkin seeds, and ghee in your diet. These foods provide essential nutrients, boost immunity, and improve skin elasticity.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीअन्नहोम रेमेडी