Right Way to Massage Hair : केस गळणे, विरळ होणे ही आजकाल अनेकांना सतावणारी कॉमन समस्या झाली आहे. वाढता स्ट्रेस, प्रदूषण, अनहेल्दी लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या च़ुकीच्या सवयी आणि हार्मोनमधील बदल ही या समस्यांची मुख्य कारणं सांगितली जातात. केस खूप जास्त गळत असतील तर टक्कल पडण्याचा धोका असतो. ज्यामुळे सौंदर्य तर बिघडतंच, सोबतच आत्मविश्वासही कमी होतो. पण जर योग्य काळजी घेतली आणि काही घरगुती उपाय केले तर केसांची वाढ पुन्हा होऊ शकते. यासाठी सगळ्यात प्रभावी आणि सुरक्षित उपाय म्हणजे तेलाने मालिश करणे. तेलाने मालिश केल्यानं डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं, सोबतच केस मुळापासून मजबूत होतात आणि ब्लड सर्कुलेशन वाढून केसांची वाढ होण्यास मदत मिळते. पण केवळ केसांनी मालिश करून चालत नाही. त्यासाठी मालिश करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी.
मालिशसाठी कोणतं तेल बेस्ट?
केसांची मालिश करण्यासाठी योग्य तेलाची निवड करणं खूप फायदेशीर असतं. जसे की, भृंगराज तेल. या तेलाला आयुर्वेदात 'केशराज' म्हणजे केसांचा राजा असं म्हटलं जातं. या तेलाने केसांचे मूळ मजबूत होऊन, नवीन केस येण्यास मदत मिळते. त्यानंतर एरंडीचं तेल सुद्धा फायदेशीर ठरतं. या तेलामध्ये रायसिनोलिक अॅसिड असतं, ज्याने केसांची वाढ होण्यास मदत मिळते. तसेच खोबऱ्याचं तेल देखील केसांसाठी अनेकदृष्टीने फायदेशीर असतं. याने डोक्याच्या त्वचेला आतपर्यंत पोषण मिळतं आणि कोंड्याची समस्याही दूर होते. ज्यामुळे केसगळती देखील थांबते. रोजमेरी ऑइल हाही केसांसाठी एक चांगला पर्याय आहे. याने डोक्याच्या त्वचेतील ब्लड सर्कुलेशन नातं आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
कशी कराल मालिश?
- मालिश करण्याआधी तेल हलकं गरम करून घ्यावं. कोमट तेल डोक्याच्या त्वचेमध्ये आतपर्यंत शिरतं. ज्यामुळे मूळांना पोषण मिळतं आणि केसांचा विकास होण्यास मदत मिळते.
- बोटांनी हळूहळू डोक्याच्या त्वचेवर गोल गोल फिरवत मालिश करा. कमीत कमी १० ते १५ मिनिटं मालिश करा. याने ब्लड सर्कुलेशन सुधारतं. जास्त जोर लावून किंवा घासून घासून मालिश करू नका. असं तेल्यास केस कमजोर होऊन तुटू शकतात.
- तेलाने केसांची मालिश करण्यासाठी रात्रीची वेळ सगळ्यात चांगली मानली जाते. तेल रात्रभर डोक्याच्या त्वचेवर राहून आपलं काम करतं. याने केसांचे मूळ मजबूत होतात. सकाळी माइल्ड शाम्पूने केस धुवा.
- पुन्हा नवीन केस उगवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे मालिश आठवड्यातून कमीत कमी ३ ते ४ वेळा करायला हवी. सतत २ ते ३ महिन्यांपर्यंत नियमितपणे मालिश केल्यास आपल्याला फरक दिसून येईल.
- केसांची वाढ करण्यासाठी मालिशसोबतच आहारात प्रोटीन, ओमेगा ३ आणि व्हिटामिन ई असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. त्यासोबतच पुरेश झोप घ्या. योगा करा.
Web Summary : Hair massage with warm oil nourishes the scalp, strengthens roots, and boosts circulation, aiding hair growth. Use Bhringraj, castor, coconut, or rosemary oil. Massage gently for 10-15 minutes thrice weekly. Diet, sleep, and yoga also promote hair health.
Web Summary : बालों में तेल मालिश ज़रूरी है, सिर्फ़ तेल लगाना नहीं। गर्म तेल से मालिश करें। भृंगराज, अरंडी, नारियल या रोज़मेरी तेल का उपयोग करें। 10-15 मिनट मालिश करें, हफ़्ते में तीन बार। आहार, नींद और योग से भी बाल स्वस्थ होते हैं।