Lokmat Sakhi >Beauty > ३ उपाय, सोपे आणि साधे - त्वचेच्या समस्या संपून त्वचा कायम राहील सुंदर

३ उपाय, सोपे आणि साधे - त्वचेच्या समस्या संपून त्वचा कायम राहील सुंदर

3 solutions for skin problems, keep your skin beautiful forever

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2025 14:54 IST2025-01-26T14:51:53+5:302025-01-26T14:54:31+5:30

3 solutions for skin problems, keep your skin beautiful forever

3 solutions for skin problems , keep your skin beautiful forever | ३ उपाय, सोपे आणि साधे - त्वचेच्या समस्या संपून त्वचा कायम राहील सुंदर

३ उपाय, सोपे आणि साधे - त्वचेच्या समस्या संपून त्वचा कायम राहील सुंदर

प्रत्येक महिलेसाठी स्किनकेअर रूटीन फार गरजेचे असते. आपण बरेचदा टाळाटाळ करतो. पण चेहर्‍याची काळजी घेणे गरजेचे असते. काही जण ब्युटी पार्लर मध्ये जावून महाग अशा ब्युटी ट्रिटमेंट्स घेतात.(3 solutions for skin problems,  keep your skin beautiful forever   ) पण प्रत्येकीच्या चेहऱ्याला ते सुट होतंच असं नाही. शिवाय कितीही नैसर्गिक म्हटले, तरी शेवटी ब्युटीप्रोडक्ट्समध्ये रसायने असतातच. सतत अशा ट्रिटमेंट करून घेणे चेहऱ्यासाठी चांगले नाहीच पण खिशासाठी ही नाही. (3 solutions for skin problems,  keep your skin beautiful forever   )घरच्या घरी स्किनकेअर, हेअरकेअर रुटीन फॉलो करता येतात. तेही नैसर्गिक संसाधनांचा वापर करून. तेचतेच हळदीचे फेस पॅक लावून कंटाळला असाल तर,  वेगळे उपाय करून बघा.(3 solutions for skin problems,  keep your skin beautiful forever   ) 

१. चेहर्‍यासाठी पपई फार चांगली. महिला पाळीमुळे पपई खाणे टाळतात. पण पपई उष्ण असली तरी, त्वचेसाठी फार चांगली. पपईमध्ये जीवनसत्त्व ए, बी आणि सी भरभरून असते. शिवाय पपई अँटीबॅक्टेरीयल असते. पपई व दही यांच्या मिश्रणातून पेस्ट तयार करा. आणि तिचा फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावा. थोड्यावेळाने धुवून टाका. चेहरा फ्रेश राहिल.(3 solutions for skin problems,  keep your skin beautiful forever   )

२. तुमची त्वचा काळी पडते का? अनेकांना ही समस्या आहे. बटाट्याचा काप करून डोळ्याखाली  किंवा काखेत घासल्यास, काळवंडलेला भाग हळूहळू स्वच्छ होऊन जाईल. बटाट्यात नैसर्गिक ब्लिचींग पदार्थ असतात. सुजलेल्या चेहर्‍यावरून सुज उतरवण्यासाठीही बटाटा वापरतात. कोपरावरचा  काळपटपणाही कमी होतो.


 
३. केसांसाठी आपण अनेक गोष्टी वापरत असतो. तुटक दिसणार्‍या केसांसाठी केळ्याचा हेअरपॅक लावल्यास केस मुलायम होतात. केळ्यामध्ये सिलीका असते. केळ्यात अनेक असे पदार्थ असतात जे केसांची मुळे मजबूत बनवतात. त्यामुळे केसासाठी केळ्याचा पॅक अतिउत्तम. केळं हाताने मऊ करून घ्या. त्यात नारळाचे तेल घाला. हे मिश्रण २० मिनिटे केसांना लावून ठेवा. नंतर धुवून टाका. केस मस्त मऊ होतात.       

असेच विविध उपाय घरी करत राहा. स्किनकेअर हेअरकेअर घरच्या घरी करणे जास्त फायदेशीर ठरेल.

Web Title: 3 solutions for skin problems , keep your skin beautiful forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.