ओठ आपल्या सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. थोडा बारकाईने विचार केला तर आपल्या चेहऱ्याची ठेवण बऱ्याच प्रमाणात आपल्या ओठांच्या आकारावर अवलंबून असते. पण नेमके ओठ काळे पडतात, भेगाळलेले होतात आणि मग त्याचा परिणाम आपल्या सौंदर्यावरही होतोच. शिवाय ओठांवर भेगा असतील, त्यातून रक्त येत असेल तर त्याचा त्रास होतो तो वेगळाच (3 Remedies For Pink Lips).. म्हणूनच भेगाळलेले, काळवंडलेले ओठ छान गुलाबी करायचे असतील (how to get pink lips?) तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(how to get rid of dark eyes?)
काळे पडलेले, भेगाळलेले ओठ गुलाबी होण्यासाठी उपाय
१. पहिला उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये मध घ्या. त्यामध्ये थोडी कॉफी पावडर घाला. आता हे दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्याने ओठांना मसाज करा. ३ ते ४ मिनिटांनी ओठ धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा आणि त्यानंतर ओठ मॉईश्चईज करा.
खा बिंधास्त पोळ्या-कणकेत ५ पदार्थ मिसळा, पोळ्या होतील जास्त पौष्टिक-शुगर वजनही वाढणार नाही
२. दुसरा उपाय करण्यासाठी आपण पिठीसाखर आणि मध हे मिश्रणही वापरू शकतो. यासाठी एका वाटीमध्ये पिठीसाखर घ्या. त्यामध्ये थोडं ग्लिसरीन घाला. साखरेमुळे ओठांवरची डेडस्किन, टॅनिंग निघून जाते आणि ग्लिसरीनमुळे ओठांना मऊपणा येतो. ओठ हायड्रेटेड राहतात.
३. तिसरा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये थोडी पिठीसाखर आणि थोडी कॉफी पावडर घाला. आता हे मिश्रण ओठांवर चोळा. साधारण २ ते ३ मिनिटांनी ओठ धुवून टाका. ओठांचा काळेपणा कमी होऊन त्यांच्यावरच्या भेगाही कमी होण्यास मदत होईल.
४. ओठ खूप जास्त भेगाळले असतील तर रात्री झोपताना २ ते ३ थेंब साजूक तूप घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. आता या पदार्थाने ओठांना मालिश करा. रात्रभर ओठ धुतले नाहीत तरी चालेल. हा उपाय काही दिवस नियमितपणे करा. ओठांवरच्या भेगा काही दिवसांतच कमी होतील.
