रोजच्या धावपळीत अनेक जणींना त्वचेची पुरेशी काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. दिवसातून दोन वेळा चेहरा धुवून मॉईश्चराईज करणे आणि फार फार तर सनस्क्रिन लावणे एवढंच काही जणींचं स्किन केअर रुटीन असतं. पण त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी एवढंच पुरेसं ठरत नाही. त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही तर कमी वयातच चेहऱ्यावर ॲक्ने, ब्रेकआऊट्स वाढू लागतात आणि त्यामुळे मग कमी वयातच आपण प्रौढ, वयस्कर दिसू लागतो. त्वचेचं सौंदर्य अशा पद्धतीने कमी होऊ द्यायचं नसेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा (how to reduce acne and breakouts on skin?). यामुळे ॲक्ने, ब्रेकआऊट्स नक्कीच कमी होतील.(home remedies to get acne free skin)
चेहऱ्यावरचे ॲक्ने, ब्रेकआऊट्स कमी करण्यासाठी उपाय
१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे दालचिनीचा. दालचिनीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेसाठी दालचिनी फायद्याची ठरते.
हा उपाय करण्यासाठी एका सहानीवर थोडा मध आणि कच्चं दूध घाला. त्यावर दालचिनीची काडी उगाळा. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा. ॲक्ने, ब्रेकआऊट्स कमी होतील. दालचिनी सगळ्यांनाच सूट होईल असं नाही. त्यामुळे हा उपाय करण्यापुर्वी पॅचटेस्ट जरुर करा.
२. पित्त प्रकृतीच्या लोकांना त्वचेवर ॲक्ने, ब्रेकआऊट्स येण्याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे या लोकांनी खस, गुलाब किंवा चंदन असणाऱ्या पदार्थांनी चेहरा धुवावा. तसेच चेहरा धुतल्यानंतर तो माॅईश्चराईज करण्यासाठी एखादं कोरफड, टी ट्री ऑईल किंवा मध यांचा बेस असणारं हायड्रेटींग मॉईश्चरायझर लावावं.
मकर संक्रांतीला काळी साडीच कशाला? बघा काळ्या रंगाच्या घागरा, लेहेंग्यांचे ८ सुंदर प्रकार
३. मनुका, तूप आणि जवसाच्या बिया हे पदार्थ दररोज नियमितपणे घेतलेच पाहिजेत. याशिवाय भरपूर पाणी पिणे, तेलकट आणि खारट पदार्थ कमी प्रमाणात खाणे हे उपायही करून पाहा. आल्याचा रस आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यासही ॲक्ने, ब्रेकआऊट्सचे प्रमाण कमी होते. पण ते करण्याआधी एकदा पॅचटेस्ट घ्यावी.
