Lokmat Sakhi >Beauty > महागडे सनस्क्रीन विसरा! बस्स काकडी काफी है, उन्हाळ्यातही चेहरा दिसेल कायम ग्लोइंग आणि फ्रेश...

महागडे सनस्क्रीन विसरा! बस्स काकडी काफी है, उन्हाळ्यातही चेहरा दिसेल कायम ग्लोइंग आणि फ्रेश...

how to use cucumber for skin during summer season : 3 Easy Ways To Use Cucumber For Skin In Summer : 3 ways to use cucumber for cool and clear skin : काकडी उन्हाळ्यात आपण खातोच, पण त्वचेच्या समस्यांसाठीही ती उत्तम आणि फायदेशीर ठरते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2025 14:58 IST2025-04-13T14:43:07+5:302025-04-13T14:58:24+5:30

how to use cucumber for skin during summer season : 3 Easy Ways To Use Cucumber For Skin In Summer : 3 ways to use cucumber for cool and clear skin : काकडी उन्हाळ्यात आपण खातोच, पण त्वचेच्या समस्यांसाठीही ती उत्तम आणि फायदेशीर ठरते..

3 Easy Ways To Use Cucumber For Skin In Summer how to use cucumber for skin during summer season | महागडे सनस्क्रीन विसरा! बस्स काकडी काफी है, उन्हाळ्यातही चेहरा दिसेल कायम ग्लोइंग आणि फ्रेश...

महागडे सनस्क्रीन विसरा! बस्स काकडी काफी है, उन्हाळ्यातही चेहरा दिसेल कायम ग्लोइंग आणि फ्रेश...

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. कडाक्याचा उन्हाळा आपल्या सगळ्यांनाचं नकोसा वाटतो. उन्हाळा म्हटलं की त्वचा आणि केसांसोबतच (3 ways to use cucumber for cool and clear skin) आरोग्याच्या अनेक तक्रारी सतावतात. उन्हाळ्यात आपल्याला त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या ऋतूंत वाढती उष्णता आणि गरमीचा थेट परिणाम आपल्या (3 Easy Ways To Use Cucumber For Skin In Summer) त्वचेवर दिसून येतो. ऊन आणि गरमीने त्वचेवर पुरळ येणे, त्वचा लालसर होणे, त्वचेवर काळपट डाग पडणे, त्वचेचे टॅनिंग होणे यासारख्या त्वचेच्या अनेक समस्या अनेकींना त्रास देतात(how to use cucumber for skin during summer season).

यासाठीच उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी आपण त्वचेला सनस्क्रीन लोशन किंवा क्रिम लावतो. तसेच उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी चेहरा झाकून घेतो. उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्रीम्स, लोशनचा वापर करतो. परंतु या उपायांसोबतच, घरात असलेली हिरवीगार काकडी देखील उन्हापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करु शकते. यंदाच्या उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी काकडी कशी फायदेशीर ठरते, आणि काकडीचा त्वचेसाठी नेमका वापर कसा करायचा ते पाहूयात. 

उन्हाळ्यात काकडीचा त्वचेसाठी नेमका वापर कसा करायचा.... 

१. फ्रोझन काकडी :- सर्वात आधी काकडी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर काकडी बरोबर मधोमध कापून त्याचे दोन तुकडे करून घ्यावेत. आता काकडीचे हे दोन तुकडे एका डिशमध्ये ठेवून, डिश फ्रिजरमध्ये ठेवून द्यावी. त्यानंतर ४ ते ५ तासांनी काकडी फ्रोझन होईल. अशी फ्रोझन काकडी आपण थेट आपल्या चेहऱ्यावर फिरवू शकता. याचबरोबर, या फ्रोझन काकडीचे काप करून देखील आपण हे काप त्वचेवर ठेवू शकता. 

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

२. काकडीचा रस :- फ्रोझन काकडी प्रमाणेच तुम्ही काकडीच्या रसाचा देखील त्वचेसाठी वापर करु शकता. काकडी किसून घ्या. त्याचा रस काढून चेहरा आणि मानेवर लावा. १५ ते २० मिनिटे ठेवा. चेहरा साध्या पाण्याने धुवा. आपण याचा नियमित वापर करू शकता. यामुळे स्किन हायड्रेटेड होते. व त्वचेच्या समस्या कमी होतात. 

३. काकडीचा किस :- सगळ्यात आधी काकडी १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घ्यावी. ही थंड झालेली काकडी फ्रिजमधून काढून किसणीवर किसून घ्यावी. त्यानंतर हा काकडीचा किस थेट त्वचेवर व्यवस्थित पसरवून लावावा. मग १५ ते ३० मिनिटे काकडीचा किस त्वचेवर तसाच लावून ठेवावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.     

उन्हाळ्यात थंडाव्यासाठी मेहेंदी ऐवजी केसांना लावा ‘हा’ सिक्रेट हेअर मास्क, भाजून काढणाऱ्या उन्हातही केस सिल्की सिल्की...

उन्हाळ्यात त्वचेसाठी काकडी वापरण्याचे फायदे... 

१. उन्हाळ्यात काकडी त्वचेवर लावल्याने त्वचेला थंडावा आणि आराम मिळतो.
२. काकडीमध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
३. काकडी टॅनिंग कमी करण्यास मदत करते.
४. काकडी त्वचेला चमकदार बनवते.
५. उन्हामुळे होणारी त्वचेची जळजळ आणि सूज कमी करते.
६. उन्हामुळे भाजून निघालेल्या त्वचेला शांत करते.


Web Title: 3 Easy Ways To Use Cucumber For Skin In Summer how to use cucumber for skin during summer season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.