Join us
Daily Top 2Weekly Top 5

हातपाय चेहऱ्यावरचे केस काढताना ३ चुका पडतात महागात, वॅक्स - स्प्रे - रेझर पाहा काय बरे आणि काय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2026 15:30 IST

3 Costly Mistakes to Avoid During Hair Removal: Wax, Spray, or Razor – What’s Safe and What’s Harmful? : शरीरावरचे केस काढताना लक्षात ठेवा या गोष्टी.

आजकाल केस काढण्यासाठी रेझर, हेअर रिमूव्हल स्प्रे, क्रीम्स असे अनेक पर्याय सहज उपलब्ध झाले आहेत. वेळ वाचवण्यासाठी आणि पार्लरचा खर्च टाळण्यासाठी अनेकजण हे प्रॉडक्ट्स वापरतात. मात्र हे वापरताना योग्य माहिती आणि काळजी घेणं खूप गरजेचं असतं.

रेझर वापरणं हा सर्वात सोपा आणि जलद पर्याय मानला जातो. विशेषतः हात-पायांसाठी तो सुरक्षित मानला जातो. मात्र कोरड्या त्वचेवर रेझर वापरणं टाळावं. (3 Costly Mistakes to Avoid During Hair Removal: Wax, Spray, or Razor – What’s Safe and What’s Harmful?)आधी त्वचा ओलसर करून त्यावर साबण, जेल किंवा शेव्हिंग फोम लावल्यास त्वचेवर ओरखडे पडत नाहीत. रेझर नेहमी स्वच्छ आणि धारदार असावा, अन्यथा त्वचेवर कापण्याचा धोका वाढतो. वापरल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावणंही आवश्यक आहे. रेझरमुळे त्वचा मात्र काळवंडते. त्याची काळजी घ्यावी.

हेअर रिमूव्हल क्रीम्स आणि स्प्रे वापरणंही सोयीचं असतं, पण त्यामध्ये रसायनांचा वापर असल्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. कोणतंही नवीन प्रॉडक्ट वापरण्याआधी त्वचेवर छोटासा पॅच टेस्ट करावा. त्यामुळे अ‍ॅलर्जी किंवा जळजळ होण्याची शक्यता आधीच कळते. क्रीम किंवा स्प्रे दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्वचेवर ठेवू नये, कारण त्यामुळे त्वचेवर रॅशेस किंवा जळजळ होऊ शकते. संवेदनशील भागांसाठी हे प्रॉडक्ट्स वापरताना अधिक सावधगिरी बाळगावी. चेहरा, अंडरआर्म्स किंवा बिकिनी एरिया यांसारख्या भागांसाठी वेगळे प्रॉडक्ट्स वापरणं योग्य ठरतं. तसेच जखम, पिंपल्स किंवा त्वचेवर इन्फेक्शन असेल तर त्या भागावर हे प्रॉडक्ट्स वापरणं टाळावं.

याशिवाय, हेअर रिमूव्हल केल्यानंतर त्वचेची योग्य काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करून हलकं मॉइश्चरायझर किंवा अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्यास त्वचा शांत राहते. लगेच उन्हात जाणं टाळावं, कारण त्वचा त्या वेळी अधिक संवेदनशील असते. हे प्रॉडक्ट्स वापरणं चुकीचं नाही, पण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काहींना रेझर सूट होतो, तर काहींना क्रीम किंवा स्प्रे अधिक सोयीचे वाटतात. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य पर्याय निवडणं आणि मर्यादित व काळजीपूर्वक वापर करणं हेच सुरक्षिततेचं रहस्य आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hair removal mistakes: Razor, wax, spray - Know pros and cons.

Web Summary : Hair removal products offer convenience, but require caution. Patch tests, limited use, and moisturizing are key. Choose methods wisely based on skin type to avoid irritation and damage.
टॅग्स :ब्यूटी टिप्सस्वच्छता टिप्सत्वचेची काळजीसोशल व्हायरल