Join us

केस कमजोर-पातळ झाले? २० रूपयांच्या जवसाचं हे घरगुती जेल लावा, दाट-लांब होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:31 IST

20 Rupees Flax Seeds Hair Mask For Strong And Long Hairs : जवसामुळे केस मऊ आणि मॅनेजेबल होतात. केसांमध्ये जास्त गुंताही होत नाही ज्यामुळे केस कमी तुटतात.

केस गळण्याची समस्या आजकाल प्रत्येकालाच उद्भवते. एकदा केस गळायला लागले तर काहीही करून चांगला परीणाम दिसून येत नाही. केस गळती रोखण्यासाठी जास्त पैसे खर्च न करता फक्त २० रूपयांत तुम्हाला चांगलं सोल्यूशन मिळेल. २० रूपयांच्या जवसानं केसांची गुणवत्ता सुधारेल आणि केस दाट होण्यासही मदत होईल. जवसानं केसांना काय फायदे मिळतात, जवसाचा वापर  केसांवर नेमका कसा करायचा समजून घेऊ. (Flax Seeds Hair Mask For Strong And Long Hairs)

जवसाने केसांना काय फायदे होतात? (Flax Seeds Hair Benefits)

जवसामुळे केस मऊ आणि मॅनेजेबल होतात. केसांमध्ये जास्त गुंताही होत नाही ज्यामुळे केस कमी तुटतात. जवस केसांना हायड्रेट ठेवतात ज्यामुळे कोरडेपणा आणि खाज  कमी होते. जसं चेहऱ्यावर आपण मॉईश्चरायजर वापरतो तसं हे जेल केसांचं मॉईश्चरायजर म्हणून काम करतं.जवसातील ओमेगा थ्री फ्रॅटी एसिड्समुळे केस मजबूत होतात. ज्यामुळे हेअर फॉल आणि ब्रेकेज कमी होतो. केस वाढवण्यासही मदत होते. केसांचा पोत सुधारतो. रफ केस मऊ होतात आणि केसांना नॅच्युरल शाईन येण्यासही मदत होते. 

जवसाचा वापर केसांवर कसा करावा?

ब्युटी कंटेट क्रिएटर माधवी मांढरेनं जवसाच्या बियांचा वापर केसांवर कसा करायचा. योग्य पद्धत, परीणाम असा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चार कप पाण्यामध्ये चार चमचे जवस ७ ते ८ मिनिटं उकळून घ्या. जेल तयार झालेलं दिसलं की गॅस बंद करून एकही सेकंदही न थांबता ते जेल गाळून घ्या. लक्षात ठेवा जेल लगेचच गाळलं नाही तर ते चिकट होतं आणि वापरता येत नाही. मास्कमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं तेल एक चमचा मिक्स करू शकता. हा हेअर मास्क केसांच्या मुळांपासून अगदी टिप्सपर्यंत लावा.

प्रत्येक हेअर लाईनवर व्यवस्थित जेल लावा.जेलमध्ये केसांना  पूर्णपणे भिजवा केस जेल लावल्यानंतर ओलसर दिसायला हवेत. त्यानंतर २० मिनिटं थांबा  मग सौम्य शॅम्पू आणि कंडीशनरनं केस  स्वच्छ धुवा.केसांवर याचा उत्तम रिजल्ट हवा असेल तर हा हेअर मास्क आठवड्यातून २ वेळा किंवा एकदा तरी नियमित लावा. ज्यामुळे केसांमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Flaxseed gel for strong, thick, and long hair at home.

Web Summary : Struggling with hair fall? This article suggests using flaxseed gel, costing only ₹20, to improve hair quality, reduce breakage, and promote stronger, longer, and shinier hair. Apply the homemade mask regularly for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी