Join us

रात्री झोपण्यापूर्वी लावा गुलाब पाणी, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक - सकाळी चेहरा बघून म्हणाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2023 11:14 IST

2 Ways To Use Rose Water For Face Overnight झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा चमचाभर गुलाब जल. पाहा वापरण्याची पद्धत - फायदे

गुलाबी, सॉफ्ट, नितळ त्वचा कोणाला नको आहे. प्रत्येकीला असे वाटते की, तिची त्वचा गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे मऊ, गुलाबी आणि क्लिन दिसावी. पण यासाठी चेहऱ्याची देखील तितकीच काळजी घ्यायला हवी. चेहऱ्यावर गुलाबी नैसर्गिक ग्लो हवा असेल तर, गुलाब पाण्याचा वापर करून पाहा.

नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून गुलाबाचे पाणी वापरले जाते. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. चेहऱ्यावर रात्रीच्या वेळी गुलाब पाणी लावून झोपण्याचे फायदे व गुलाब पाणी चेहऱ्यावर लावायचे कसे, हे पाहूयात(2 Ways To Use Rose Water For Face Overnight).

गुलाब जलमुळे चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

रात्री चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्यास ते त्वचेत चांगले शोषले जाते. हे त्वचेला मॉइश्चरायज करते. ज्यामुळे चेहरा सकाळी उठल्यावर टवटवीत - फ्रेश दिसते. गुलाब जलमुळे त्वचेच्या पेशींमध्ये आर्द्रता राहते. ज्यामुळे स्किनला नैसर्गिक चमक मिळते.

चेहऱ्यावर जाडजाड पिंपल्स-पुळ्या-मुरुमांचं जंगल? पुळ्या फोडल्या तर ते जास्त वाढतात का? कसा कमी होईल त्रास

गुलाबपाणी त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवते

अनेकदा त्वचेचे पीएच पातळीचे संतुलन बिघडल्यामुळे ती निस्तेज होते. ज्यामुळे त्वचा ड्राय - निर्जीव दिसते. प्रदूषण, झोप न लागणे, डिहायड्रेशन व त्वचेवर चुकीच्या उत्पादनांचा वापर करणे, यामुळे त्वचेच्या पीएचवर परिणाम होतो. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबपाणी लावायचे कसे?

अनेकदा स्किन टॅन होते. किंवा डेड स्किनमागे आपली त्वचा लपली जाते. अशा वेळी आपण गुलाब पाण्याचा वापर करू शकता. यासाठी रात्री चेहरा स्वच्छ धुवून घ्या. झोपण्यापूर्वी त्वचेवर गुलाबजल स्प्रे करा. हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. थोड्या वेळानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आपण गुलाब जलमध्ये लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता.

चेहऱ्यावर चमचाभर दुधाची साय लावा; दिसाल तरूण-सुंदर, मिळतील फायदेच फायदे

गुलाबपाणी त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर आहे का?

रात्री चेहऱ्यावर गुलाबपाणी वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते. रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा. रात्रभर त्वचा गुलाब पाणी शोषून घेईल. सकाळी नेहमीप्रमाणे चेहरा पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी