Join us

चेहरा खूप काळवंडला- आजारी असल्यासारख्या निस्तेज दिसताय? २ उपाय- काही मिनिटांत चेहरा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 12:46 IST

2 Simple Remedies For Dull and Dry Skin: चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करायचं असेल आणि चेहऱ्यावर छान तेजस्वी ग्लो हवा असेल तर हे काही सोपे उपाय लगेचच करून पाहा..(how to get rid of tanning and dead skin?) 

ठळक मुद्देहे उपाय जर तुम्ही नियमितपणे केले तर अगदी नवरात्रीपर्यंत तुमचा चेहरा खूप छान चमकू लागेल.

बहुतांश मैत्रिणींच्या मागे रोजची एवढी कामं असतात की त्या कामांमधून स्वत:साठी वेळ काढणं त्यांना अजिबातच शक्य होत नाही. अशावेळी मग दोन- अडीच तासांचा वेळ काढून पार्लरमध्ये निवांत जाऊन बसणं, फेशियल- क्लिनअप करणं या गोष्टी तर अगदीच अशक्य. याचा परिणाम मग हळूहळू त्वचेवर दिसायला लागतो. काही दिवसांतच त्वचेवरची चमक कमी होते. कारण त्वचेवर डेड स्किन, टॅनिंग वाढायला लागतं (how to get rid of tanning and dead skin?). यामुळे त्वचा काळवंडून जातो आणि चेहऱ्यावरचा ग्लो कमी झाल्यामुळे आपण अगदी आजारी असल्यासारखं निस्तेज दिसू लागतो. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर हे काही उपाय लगेचच करायला सुरुवात करा (2 simple remedies for dull and dry skin). हे उपाय जर तुम्ही नियमितपणे केले तर अगदी नवरात्रीपर्यंत तुमचा चेहरा खूप छान चमकू लागेल.(simple home hacks for radiant glowing skin)

 

चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन कमी करण्यासाठी उपाय

१. हा उपाय करण्यासाठी आपण घरच्याघरी एक स्क्रबर तयार करणार आहाेत. हे स्क्रबर वापरल्यामुळे हळूहळू डेडस्किन आणि टॅनिंग कमी होऊन त्वचा नितळ होईल. हा उपाय करण्यासाठी प्लेन ओट्स घ्या आणि ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पावडर करा. आता एका वाटीमध्ये १ चमचा ओट्सची बारीक केलेली पावडर घ्या. त्यामध्ये १ चमचा टोमॅटोचा रस आणि १ चमचा आंबट दही घाला. हा लेप आता तुमच्या चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने गोलाकार चोळून एखाद्या मिनिटासाठी मसाज करा. यानंतर ५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येईल.

 

२. वरील उपाय करतानाच रोज रात्री चेहऱ्यावर घरीच तयार केलेेलं नाईट क्रिम लावा. हे क्रिम तयार करण्यासाठी १ बदाम थोड्याशा दुधामध्ये भिजत घाला. यानंतर भिजलेल्या बदामाची सालं काढून तो दुधामध्ये उगाळून घ्या. बदामाच्या पेस्टमध्ये ३ ते ४ थेंब केशराचं पाणी आणि अर्धा चमचा ॲलोव्हेरा जेल घाला. सगळं मिश्रण हलवून एकत्र करा आणि हे क्रिम रोज रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेला लावा. सकाळी चेहरा धुवून टाका. काही दिवसांतच त्वचेवर खूप छान चमक आलेली दिसेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी