Join us

स्वयंपाकघरातील २ पदार्थांनी होईल चेहरा स्वच्छ, स्वस्तात मस्त उपाय - महागडा फेश वॉशही वाटेल जेमतेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 10:57 IST

Kitchen Secrets for Glowing Skin: homemade face wash: natural face wash recipe: kitchen ingredients for skincare: महागडे क्लिंजर खरेदी करण्याऐवजी आपण घरच्या घरी फेस वॉश तयार करु शकतो.

त्वचा सुंदर दिसावी, ग्लो यावा यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो.(Skin care Tips) सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण चेहऱ्यावर अनेक क्रीम्सचा वापर करत असतो. चेहरा स्वच्छ करण्याची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तो स्वच्छ करणे.(Kitchen Secrets for Glowing Skin) चेहरा व्यवस्थित स्वच्छ केला नाही तर त्यावर मृत पेशी जमा राहतात. तसेच त्यावर तेल, घाण तयार होते. यासाठी चेहरा योग्यरित्या स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. (homemade face wash)बाजारात अनेक महागड्या पद्धतीचे फेस वॉश मिळतात.(natural face wash recipe) ज्यामुळे आपला चेहरा स्वच्छ करता येतो. परंतु, यामध्ये काही रासायनिक उत्पादनांचा वापर केला जातो.(kitchen ingredients for skincare) ज्यामुळे त्वचेला हानी होते. महागड्या फेस वॉशमुळे पैसे देखील खर्च होतात आणि चेहरा देखील खराब होतो. अशावेळी महागडे क्लिंजर खरेदी करण्याऐवजी आपण घरच्या घरी फेस वॉश तयार करु शकतो. (natural skin cleansing tips)

मेकअप रिमूव्हरसाठी खास तेल! 'देसी गर्ल प्रियंका चोप्रा'ने सांगितली भन्नाट टिप्स, पैसे वाचतील

घरी फेस वॉश कसा बनवायचा?

आपल्या स्वयंपाकघरात दोन असे पदार्थ असतात जे कायम आढळतात. चेहऱ्यावर तेल किंवा घाण जमा झाली असेल किंवा खराब दिसत असेल दही आणि बेसन फायदेशीर ठरेल. तज्ज्ञ सांगतात की, बेसनात थोडे दही मिसळा आणि ते फेसवॉशसारखे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा तलेजदार होण्यास मदत होते. 

1. कच्चे दूध चेहरा स्वच्छ करण्यासाठी कच्चे दूध देखील क्लिंजर म्हणून चांगले आहे. यामुळे त्वचेवर साचलेली घाण आणि जास्तीचे तेल निघून जाते. सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा लावल्याने चेहरा चांगला होतो. एका भांड्यात दूध घ्या, त्यात कापूस बडवून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा चांगली स्वच्छ होते. 

2. काकडीचा रस 

काकडीच्या रसाला दह्यात कालवून लावल्याने फरक जाणवतो. दही आणि काकडीच्या रसाचे हे मिश्रण चांगले फेसवॉश म्हणून काम करते. 

3. टोमॅटो 

टोमॅटोचा लगदा देखील चेहऱ्यासाठी वापरता येतो. यासाठी टोमॅटो बारीक करुन त्याचा रस आपण चेहऱ्यावर लावू शकतो. चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चोळा नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी