काही जणींना कामानिमित्त रोजच उन्हामध्ये फिरावं लागतं. उन्हात फिरताना चेहरा पुर्णपणे रुमालाने गुंडाळून घेतला तरी कपाळाचा काही भाग उघडा राहातो. त्यामुळे मग कपाळ काळवंडून जातं. त्या तुलनेत गालांवर किंवा चेहऱ्याच्या इतर भागावर बरंच कमी टॅनिंग असतं. यामुळे मग चेहऱ्याच्या त्वचेचा रंग वेगवेगळा दिसू लागतो. याचा तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतोच. म्हणूनच कपाळावरचं टॅनिंग आणि डेडस्किन कमी करण्यासाठी घरच्याघरी काही सोपे उपाय करून पाहा..(2 home remedies to reduce tanning and dead skin from forehead)
कपाळावरचं टॅनिंग, डेडस्किन कमी करण्यासाठी उपाय
१. बेसन आणि दही
बेसन म्हणजेच हरबरा डाळीचं पीठ आपल्याकडे खूप आधीपासून सौंदर्य खुलविण्यासाठी वापरलं जातं. त्याचाच उपयोग करून कपाळावरचं टॅनिंग आणि डेडस्किन कशी काढून टाकायची ते पाहूया. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ ते २ चमचे बेसन घ्या.
घरभर झुरळं पळताना दिसतात? आठवड्यातून एकदा 'हे' पाणी शिंपडा- घरात झुरळं होणार नाहीत
त्यामध्ये १ टीस्पून भाजून घेतलेली हळद, १ चमचा लिंबाचा रस आणि २ चमचे दही घाला. आता सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. हा लेप कपाळाला लावा. लावताना बोटांच्या टोकाने थोडेसे चोळा. १० ते १५ मिनिटांसाठी तो लेप तसाच कपाळावर राहू द्या. त्यानंतर चोळून काढून टाका आणि पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. लगेचच खूप छान फरक जाणवेल.
२. तांदळाचं पीठ
सौंदर्य विषयक वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी तांदळाचं पीठही अतिशय उपयुक्त ठरत आहे. कपाळावरचं टॅनिंग कमी करण्यासाठीही तांदळाचं पीठ निश्चितच उपयोगी ठरू शकतं. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये तांदळाचं दूध घ्या. त्यात थोडं कच्चं दूध आणि १ चमचा कॉफी पावडर घाला.
छोट्या- छोट्या गोष्टींचाही खूप विचार करता- झोपही येत नाही? 'ही' योगमुद्रा करा- मन शांत होईल
थोडासा बटाट्याचा रस घालून हे मिश्रण कालवून घ्या. आता हा लेप तुमच्या कपाळावर लावा आणि साधारण १५ ते २० मिनिटांनी तो चाेळून काढून टाका. चेहरा धुतल्यानंतर व्यवस्थित माॅईश्चराईज करा. कपाळावरचं टॅनिंग कमी झाल्यासारखं जाणवेल.