Chemical Which Damage your Hair: केसांची काळजी घेण्यासाठी महिला रोज वेगवेगळे उपाय करत असतात. महागडी उत्पादनं किंवा घरगुती केले जातात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुतले जातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केस धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामुळेच केस डॅमेज होतात. पाण्यात असे दोन नुकसानकारक तत्व असतात जे केसांचं नुकसान करतात. तसेच शाम्पूमध्येही असे काही तत्व असतात जे केसांचं नुकसान करतात. ज्यामुळे केस तुटणे, केसगळती, केस रखरखीत होणे अशा समस्या होतात. अशात यापासून वाचवण्यासाठी काय उपाय करावे आणि पाण्यातील कोणते तत्व केस खराब करतात हे जाणून घेऊ.
पाण्यातील चार केमिकल
एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, केस डॅमेज करण्यात चार घातक केमिकलचा मोठा हात असतो. क्लोरिन, फ्लोराइड, अल्कोहोल आणि सोडिअम लॉरिअल सल्फेट. यातील केमिकल पाण्यात असतात. जर पाणी स्वच्छ नसेल तर हे दोन केमिकल पाण्यात राहतातच. जे केसांचं नुकसान करतात.
केसांचं नुकसान होतंय कसं कळेल?
रिपोर्टनुसार, जर केसांमध्ये जास्त ड्रायनेस असेल, केस जास्त तुटत असेल, रखरखीत दिसत असेल, नॅचरल रंग दिसत नसेल, चमक कमी झाली असेल, डोक्याच्या त्वचेमध्ये खाज होत असेल, तर केसांवर या घातक केमिकलनं आपला प्रभाव दाखवणं सुरू केला असं समजा.
कसं होतं नुकसान?
एक्सपर्ट सांगतात की, क्लोरिनमुळे केसांमधील नॅचरल ऑइल शोषलं जातं आणि डोक्याच्या त्वचेमध्ये खाज वाढते. ज्यामुळे केसांना दोन तोंड फुटतात. त्यानंतर केस तुटू लागतात. जर तुम्ही जास्त खाऱ्या पाण्यानं आंघोळ करत असाल तर ही समस्या जास्त होते. यानं मेलानिनचंही नुकसान होतं. ज्यामुळे केसांचां रंग जातो. तसेच पाण्यातील फ्लोराइड डोक्याच्या त्वचेमध्ये इन्फ्लेमेशन निर्माण करतं. ज्यामुळे हेअर फॉलिकल्स दबून जातात आणि त्यांची वाढ खुंटते. याच कारणानं केस ड्राय होतात.
तेच अल्कोहोल केसांसाठी खराब नाही. पण शॉर्ट चेन अल्कोहोल जसे की, आयसोप्रोपाइल अल्कोहोलमुळे केसांचं मॉइश्चर खराब होतं. केस कमजोर आणि ड्राय होतात. सोडिअम लॉरियल सल्फेटबाबत सांगायचं तर हे जवळपास सगळ्याच शाम्पूमध्ये असतं. हे एक हार्श डिटर्जेंट आहे. यामुळे केसांमधील नॅचरल ऑइल नष्ट होतं. ज्यामुळे केस डल दिसतात.
यापासून बचावाचा उपाय...
केसांची समस्या दूर करण्यासाठी चांगली गुणवत्ता असलेल्या पाण्यानं आंघोळ करावी. समुद्र किंवा स्वीमिंग पूलच्या पाण्यात कमी आंघोळ करावी. आरोच्या पाण्यानं आंघोळ करत असाल तर खूप चांगलं. जर पर्याय नसेल तर शाम्पू लावल्यानंतर केसांना क्लेरिफाइंग शाम्पू लावा. यानं केसांमधून क्लोरिन आणि फ्लोरायइड निघून जातं. तसेच जास्त सल्फेट असलेल्या शाम्पूचा वापर कमी करा. त्यासोबतच शाम्पूऐवजी नॅचरल गोष्टी जसे की, शिकेकाई, आवळा इत्यादींचा वापर अधिक करा.