Curly Hair Care Home Remedies: महिलांची सुंदरता त्यांच्या केसांमुळे अधिक वाढत असते. लांब, चमकदार, मुलायम आणि दाट केस सगळ्याच महिलांना हवे असतात. काही महिलांचे केस सरळ असतात, तर काहींचे केस कुरळे असतात. कुरळे केस असतील तर अधिक काळजी घ्यावी लागते. कारण कुरळे केस एकमेकांमध्ये अधिक गुंतलेले असतात आणि त्यामुळे ते अधिक तुटतात सोबतच गळतात सुद्धा. अशात कुरळे केस असलेल्या महिलांना नेहमीच केस नीटनेटके ठेवण्यास समस्या होते. अशात आज आम्ही तुम्हाला कुरळे केस सुटसुटीत, मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी काही घरगुती हेअर मास्क सांगणार आहोत.
कुरळ्या केसांसाठी घरगुती हेअर मास्क
बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या हेअर मास्कमध्ये केमिकल्स भरपूर असतात. त्यामुळे यांपासून तात्पुरते जरी केस चांगले दिसत असले तरी पुढे केसांचं नुकसानही होतं. कुरळ्या केसांची काळजी सरळ केसांच्या तुलनेत अधिक घ्यावी लागते. अशात घरगुती नॅचरल उपाय अधिक फायदेशीर ठरतात.
1) केळी आणि मधाचा हेअर मास्क
केळीमध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात. जे केसांना आतून पोषण देतात. तसेच मधातील नॅचरल तत्व केसांना मॉइश्चराइज करतात. तसेच या दोन्ही गोष्टींमुळे केस मजबूत आणि मुलायम होतात.
कसा तयार कराल?
हा हेअर मास्क तयार करण्यासाठी दोन पिकलेली केळी घ्या आणि चांगल्या बारीक करा. नंतर त्यात एक चमचा मध मिक्स करा. हा हेअर मास्क केसांना लावू शकता. या हेअर मास्कनं केस तुटत नाहीत. नॅचरल मुलायम होतात आणि मजबूत होतात.
2) खोबऱ्याचं तेल आणि कोरफड
कोरफडीच्या गरानं केसांसंबंधी अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तसेच केसांना पोषण देण्यासाठी आणि वाढीसाठी खूप आधीपासून खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. अशात या दोन गोष्टींपासून तयार हेअर मास्क कुरळ्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
कसा तयार कराल?
हा हेअर मास्क तयार करण्यासाठी अर्धा वाटी ताज्या कोरफडीचा गर घ्या. त्यात चार ते पाच(केसांना पुरेस एवढं) चमचे खोबऱ्याचं तेल टाका. दोन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करा. हा मास्क केसाच्या मूळात लावा. काही वेळ हलक्या हातानं डोक्याच्या त्वचेची मालिश करा. 30 मिनिटांनंतर केस धुवून घ्या. केस मुलायम, मोकळे, चमकदार आणि मजबूत होतील.
दोन्ही हेअर मास्क हे नॅचरल आहेत. या गोष्टींमुळे केसांना खोलवर पोषण मिळतं. तसेच यात केमिकल्स नसल्यानं केसांचं किंवा डोक्याच्या त्वचेचं नुकसानही होणार नाही.