मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, सुप्रिया सुळे की अजित पवार?; रोहित पवारांच 'पॉवरफुल' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 18:11 IST
1 / 5संगमनेरमध्ये आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. 2 / 5मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, सुप्रिया सुळे की अजित पवार असा प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगतिले ते होतील असं रोहितने सांगितले.3 / 5कार्यक्रमामधील रॅपिड फायर प्रश्नोत्तरात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांना तात्या विंचू की कवट्या महाकाळा या दोघांमधील कोणता खलनायक आवडतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित पवार यांनी कवट्या महाकाळ खलनायक म्हणून आवडतो असं सांगितले.4 / 5भाजपाचे नेते सुजय विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे कोणाकडून अजून अपेक्षा आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर एक चांगल काम करतो आहे. तर एकाला स्वभाव बदलण्याची अपेक्षा असल्याचे सांगत सुजय विखे पाटील यांना रोहित पवारांनी टोला लगावला.5 / 5रोहित पवारला बारामती जवळचं वाटतं की कर्जत- जामखेड असा प्रश्न विचारल्यानंतर मला कर्जत- जामखेड जवळचं असल्याचे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.