शिवतीर्थावर राजगर्जना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 10:54 PM2018-03-18T22:54:02+5:302018-03-18T22:54:02+5:30

मुंबईत रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेतर्फे ‘पाडवा मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते.

पाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना नेमका काय संदेश देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

राज यांनी आपल्या भाषणात अपेक्षेप्रमाणे जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली. मुंबई शहरात आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात पोस्टर्स लावण्यात आली होती.

राज ठाकरेंच्या या सभेला लोकांनी मोठी गर्दी केली होती. मनसे संपली असे म्हणणाऱ्यांनी एकदा ही गर्दी पाहावी, असा टोला राज यांनी लगावला.

यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका केली.