मुंबईत एलिफंट परेड प्रदर्शनात साकारल्या हत्तींच्या शिल्पाकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 11:56 PM2018-03-05T23:56:07+5:302018-03-05T23:56:07+5:30

मुंबईत एलिफंट परेड या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून हत्तींच्या शिल्पाकृती पाहायला मिळतायत. (सर्व छायाचित्रं- दत्ता खेडेकर)

या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून जंगल वाचवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘एलिफंट फॅमिली’ आणि ‘गुड अर्थ’ यांनी संयुक्त विद्यमाने या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एलिफंट परेडचे उद्घाटन करण्यात आलं आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे 101 हत्तींच्या शिल्पाकृती सादर करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे यातील काही शिल्पे ही अभिनेते अमिताभ बच्चन, एल. एन. तल्लूर, सब्यसाची मुखर्जी, मसाबा गुप्ता सारख्या दिग्गजांनी साकारली आहेत.