नऊवारी नेसून चित्रा वाघ यांची योगासने; अयोध्या पौळचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 08:00 PM2023-06-21T20:00:52+5:302023-06-21T20:30:54+5:30

जागतिक योग दिवस निमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे भाजप महिला मोर्चातर्फे 'जगात भारी योगा अन् नऊवारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक योग दिवस निमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे भाजप महिला मोर्चातर्फे 'जगात भारी योगा अन् नऊवारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्त्वात मुंबईत नऊवारी साडी परिधान करुन हा योगा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी, महिलांनी विविध योगासने आणि प्राणायमे करत सुदृढ शरीर आणि स्वस्थ शरिराचा संदेश दिला.

भाजपने पक्षाच्या महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, महिलांची नऊवारी नेसून योगासने दिसून येतात.

दरम्यान, सोशल मीडियावर काहींनी भाजपच्या या नऊवारी नेसून योगासनाच्या उपक्रमाला ट्रोल केलं आहे. नऊवारी साडी नेसून आणि दागिने परिधान करून योगा असतो का, असा सवालही अनेकांनी विचारलाय.

नऊवारी साडी नेसून, टोपलंभर मेकअप अन् दागिने घालून #योगा करतात हे जागतिक स्तराच्या एकमेव महिला नेत्या चित्रा काकू यांच्याकडूनच समजलं, अशी खोचक टिका शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी केलीय.

मुंबई येथे खास महिलांसाठी सकाळी ९ वाजून ९ मिनीटांनी नऊवारी नेसत मुंबईचे प्रवेशद्वार “गेट वे ऑफ इंडीया” ९० महिला योगा करणार आहेत, आपणही या असे निमंत्रण चित्रा वाघ यांनी दिले होते.

भाजपा महिला मोर्चाकडून करण्यात आलेला नऊवारी नेसून योगा दिनाचा उपक्रम चांगलाच चर्चेत आहे, सोशल मीडियातही त्याची चर्चा होत आहे