विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन, बाजारात खरेदीसाठी लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 08:23 PM2017-08-24T20:23:20+5:302017-08-24T21:25:51+5:30

विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. अवघी मुंबापुरी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उत्सुक आहे. (फोटो - स्वप्निल साखरे)

लाडक्या बाप्पांना घरी घेऊन जाताना तरुणी (फोटो - स्वप्निल साखरे)

लालबाग दादरसह इतर बाजारपेठांमधील खरेदीचा उत्साह ओसंडून वाहतोय (फोटो - सुशिल कदम)

मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येतोय (फोटो - सुशिल कदम)

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील अबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतलेत (फोटो - सुशिल कदम)

उद्यापासून राज्याच्या कानाकोप-यात ‘मोरया…मोरया’चा जयघोष असेल. (फोटो - सुशिल कदम)

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येईल (फोटो - सुशिल कदम)