शहर रचना, शिक्षण, ‘बेस्ट’च्या सारथीही महिलाच; वैधानिक समित्यांवर ‘अविरोध’चा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 05:57 IST2026-02-20T05:57:06+5:302026-02-20T05:57:38+5:30

शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या राजश्री शिरवाडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या संध्या दोशी, तर बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी अर्ज सादर दाखल केले आहेत.

Women are also the drivers of city planning, education, and 'BEST'; Path of 'no opposition' paved for statutory committees | शहर रचना, शिक्षण, ‘बेस्ट’च्या सारथीही महिलाच; वैधानिक समित्यांवर ‘अविरोध’चा मार्ग मोकळा

शहर रचना, शिक्षण, ‘बेस्ट’च्या सारथीही महिलाच; वैधानिक समित्यांवर ‘अविरोध’चा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी महिला विराजमान झाल्यानंतर सुधार, शिक्षण आणि बेस्टसारख्या महत्त्वाच्या वैधानिक समित्यांवरही नगरसेविकांची वर्णी लागली आहे. यामुळे महापालिकेत महापौरपदापासून विरोधी पक्षनेत्यापर्यंत आणि वैधानिक समित्यांवरही महिला नेतृत्त्वाचाच आवाज घुमणार आहे.

शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या राजश्री शिरवाडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या संध्या दोशी, तर बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी अर्ज सादर दाखल केले आहेत. या चारही वैधानिक समित्यांची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने या समित्यांच्या अध्यक्षस्थानी महिला नेतृत्व असेल, हे स्पष्ट झाले आहे.

वैधानिक समित्यांवरील अध्यक्षपदाची सुत्रे महिलांच्या हाती आल्याने प्रशासनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय, संकल्पना मांडल्या जातील, अशी अपेक्षा केली जात आहे. स्थायी समित्यांवर अध्यक्षपदी महिलांचे राजकारणात सक्रिय नेतृत्त्व वाढल्यामुळे प्रशासनाला योग्य आणि नियोजनबद्ध दिशा मिळू शकते, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

२२७पैकी १३० जागांवर महिलांना संधी

यंदाच्या पालिका निवडणुकांमध्ये मुंबईकरांनी २२७पैकी १३० जागांवर महिलांना नेतृत्त्वाची संधी दिली आहे.

महापौर आणि विरोधी पक्षनेतेपदीही रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांची निवड झाल्याने पालिका प्रशासनाची धुरा ही आधीच महिलांच्या हाती आली आहे.

महिलांनी गाजवले सभागृह

याआधी मुंबई महानगरपालिकेत महिला नेतृत्त्वाने पालिका सभागृह गाजवले असून, विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांची वर्णी लागली आहे.

यंदाही सभागृहात विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव, किशोरी पेडणेकर, अजंता यादव, राजश्री शिरवाडकर, अंजली नाईक, सईदा खान, राखी जाधव अशा अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका सभागृहात कामकाज पाहणार आहेत.

...यात बदल अपेक्षित

यंदा पालिका प्रशासनात महिला राज दिसत असल्यामुळे मुंबईच्या भौतिक सेवांसोबत शिक्षण आणि आरोग्याशी तसेच बेस्टशी निगडीत सेवा अधिक दर्जेदार होतील, अशी अपेक्षा केली जात आहे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये आणि अंगणवाड्यांसोबत महिला बालकल्याणशी, पर्यावरणाशी संबंधित मुंबईतील समस्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. विरोधी पक्षाकडून या पदांसाठी कोणीही अर्ज न भरल्यामुळे ही  निवडणूक बिनविरोध होईल. या पदासाठी  भाजपकडून अनुक्रमे प्रभाकर शिंदे आणि राजश्री शिरवाडकर यांनी अर्ज भरले आहेत.

आधी शिक्षण समिती अध्यक्षांची निवड होईल, त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांची निवड होईल. दोन्ही समित्यांच्या दालनात स्वतंत्रपणे ही निवडणूक होईल. यावेळी सर्वप्रथम महापौर संबंधित समित्यांच्या अध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या नामांकनाची नावे वाचून दाखवतील.

दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने आवाजी मतदानाने बिनविरोध निवड होईल. ही निवडणूक झाल्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी सुधार आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाची निवड होईल. या पदासाठी अनुक्रमे शिंदेसेनेच्या संध्या दोशी आणि तृष्णा विश्वासराव यांनी अर्ज भरले आहेत.

Web Title : मुंबई के नागरिक निकाय: शहर योजना, शिक्षा और बेस्ट का नेतृत्व महिलाएं करेंगी

Web Summary : मुंबई की प्रमुख नागरिक समितियाँ शहर योजना से लेकर शिक्षा तक महिलाओं के नेतृत्व में होंगी। यह नगर पालिका में महिलाओं के शीर्ष पदों पर बने रहने की प्रवृत्ति का अनुसरण करता है, जो प्रभावशाली निर्णयों और सार्वजनिक सेवाओं, स्वच्छता और पर्यावरणीय मुद्दों पर ध्यान केंद्रित करने का वादा करता है।

Web Title : Mumbai's Civic Bodies: Women Lead City Planning, Education, and BEST

Web Summary : Mumbai's key civic committees will be led by women, from city planning to education. This follows a trend of women holding top positions in the municipality, promising impactful decisions and a focus on public services, sanitation, and environmental issues.

टॅग्स :Mumbaiमुंबई