स्विमिंगदरम्यान महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:28 IST2019-05-24T19:27:24+5:302019-05-24T19:28:51+5:30
मृत महिलेचे नाव व्हर्जिनिया मोन्तेयरो (५२) असं आहे.

स्विमिंगदरम्यान महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू
ठळक मुद्देरुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मुंबई - अंधेरी पूर्व येथील शेरे - पंजाब जिमखाना येथे एक ५२ वर्षीय महिला स्विमिंगकरीत गेली होती. मात्र, पाण्यात उतरताच तिला अस्तावस्थ वाटू लागले. दरम्यान तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव व्हर्जिनिया मोन्तेयरो (५२) असं आहे.
स्विमिंगदरम्यान ५२ वर्षीय महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू असून शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत अपमृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अशी माहिती टाइम्सने दिली आहे.
मुंबई - अंधेरीतील शेरे - पंजाब जिमखान्याच्या स्विमिंगदरम्यान ५२ वर्षीय महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2019